प्रतिनिधी गौरव बुरांडे घोट
चामोर्शी तालुक्यातील रेगडी, पलसपुर, माडेआमगाव,गरंजी अशा अनेक गावात विजेची समस्या ही कायमची झाली आहे
सन २०२१ मध्ये रेगडी येथे ३३ केव्ही उपकेंद्र झाले हे खरे पण विजेची समस्या अजूनही कायमच आहे
मागील एक आठवड्या पासून गरंजी गाव अंधारात आहेलाईनमन व अधिकारी यांच्याशी संपर्क केला तर कॉल उचलत नसल्याचे गरंजी येथील नागरिक हैराण झाले आहेत
अखेर गरंजी गावकरी या त्रासाला कंटाळून थेट शिवसेनेचे जिल्हा सचिव प्रशांत भाऊ शाहा यांच्याशी संपर्क साधले
नंतर शाहा यांनी थेट महावितरणच्या अधिकाऱ्यांना बोलून गरंजी येथील खंडित वीज पुरवठा सुळरीत करून देण्यास सांगितले असता त्यांनी नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून आम्ही दोन दिवसात विद्युत पुरवठा सुळरीत करू अशी आश्वासन यावेळी दिले.
रेगडी परिसरात वीज बिल घेऊन ग्राहक त्रस्त आहेत.अनेकांचे बिल जास्त येत असल्याने गोरगरीब आदिवासी धास्तावून गेले आहे
ज्यांच्या घरी फक्त एक बल्प आणि एक पंखा आहे अशा ग्राहकांना एका महिन्याचा बिल सहा हजार एवढा आला आहे.वीज बिल देखील बिना रीडिंग ने येत असल्याचे तक्रार नागरिकांन कडून केली जात आहे