विकासाची शाश्वती हेच भाजपाच्या विकासाचे तंत्र…आमदार देवराव भोंगळे…

105

संपादक प्रशांत बिट्टूरवार

शेणगाव ग्रामपंचायतीच्या काँग्रेस , शेतकरी संघटनेच्या सरपंच_ उपसरपंचासह अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर पक्षप्रवेश

आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून घेतला पक्षप्रवेशाचा निर्णय…..

राजुरा : भाजप सरकारने केंद्रात आणि राज्यात विकासाची दिशा निश्चित केली आहे. रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य, शेतकऱ्यांसाठी थेट मदत, युवकांसाठी कौशल्य विकास यासारख्या प्रत्येक क्षेत्रात आमचा फोकस आहे. आज गावागावात बदल दिसतोय कारण आम्ही काम करत आहोत , जनतेच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणे ही आमची प्राथमिकता आहे. शासनाच्या लोककल्याणकारी योजनेचा लाभ समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहचविणे हेच भाजपाच्या विकासाचे तंत्र असल्याचे प्रतिपादन आमदार देवराव भोंगळे यांनी केले.

राजुरा येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात जिवती तालुक्यातील शेणगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच मारूबाई सिडाम व काँग्रेसचे उपसरपंच दिगांबर पोले यांचेसह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात जाहीर पक्षप्रवेश केला यावेळी आमदार भोंगळे बोलत होते.

आमदार भोंगळे पुढे म्हणाले, “भाजप हा केवळ पक्ष नाही, तर एक कुटुंब आहे. सर्वांगीण विकास, सुशासन आणि पारदर्शक कारभार हे आमचे ध्येय आहे. शेतकरी, कामगार, महिला, युवक यांच्यासाठी केंद्र व राज्य सरकार विविध योजना राबवत आहे. या योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा कार्यकर्त्यांची नितांत गरज आहे.” पक्षप्रवेशामुळे भाजपाचे राजकीय बळ वाढण्यास मदत होणार आहे. ग्रामपंचायतीपासून ते तालुका पातळीवरील निर्णय प्रक्रियेत भाजपचा प्रभाव अधिक दृढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी भाजपात प्रवेश करणाऱ्या नवप्रवेशितांमध्ये सरपंच मारूबाई सिडाम, उपसरपंच दिगंबर पोले, चंद्रभागाबाई पोले , तुळशीराम सलगर , बालाजी सलगर , शिवाजी श्रीगंगले , अंकुश पोले , गणपत पालथे , तुकाराम शिंदे , बालाजी गायकवाड , विश्वनाथ केजगीर, बाबुराव गायकवाड , गणेश गायकवाड , ज्ञानेश्वर पोले , राहुल पोले , पुष्पाबाई कवडे , प्रभू उघडे , सोपान भोरे, इमरान अन्सर शेख , इर्शाद शेख , उस्मान शेख सय्यद, बालाजी मुंगोळे, रियाज शेख आदी कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

यावेळी पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजपाचे जिवती तालुकाध्यक्ष दत्ता राठोड , शहराध्यक्ष राजेश राठोड, महामंत्री पुंडलिक गिरमाजी, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष महेश देवकते, नगरसेवक अशपाक शेख, नगरसेविका इंदिराबाई काकडे, अजय खंडरे, बालाजी बिराजदार, संग्राम बाजगीर, संभाजी शिंदे, रामेश्वर देवतळे, विठ्ठल कोजगिर, गुडनाथ एकलारे भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.