रेगडी आश्रमशाळेच्या बीटस्तरिय क्रीडा संमेलना चे मा .आ. डॉ देवराव होळी यांच्या हस्ते उद्घाटन…

172

प्रतिनिधी गौरव बुरांडे

क्रीडा संमेलनाच्या माध्यमातून उत्कृष्ट खेळाडू निर्माण करण्याची मिळते प्रेरणा – माजी आमदार डॉ देवराव होळी यांचे प्रतिपादन

एकात्मिक आदिवासी विभाग प्रकल्प गडचिरोली अंतर्गत चामोर्शी तालुक्यातील भाडभिडी केंद्राद्वारा बीटस्तरीय क्रीडा संमेलनाचे शासकिय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रमशाळा रेगडी येथे माजी आमदार डॉ देवराव होळी यांच्या हस्ते मोठया थाटात उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी आमदार डॉ देवराव होळी यांनी मशाल पेटवली व कार्यक्रमाचे रीतसर उद्घाटन केले. भाडभिडी केंद्राअंतर्गत येणाऱ्या आश्रमशाळेच्या सहभाही खेळाडूंनी प्रमुख उपस्थितांना मानवंदना दीली.

यावेळी उद्घाटनीय स्थानावरून बोलताना माजी आमदार डॉ देवराव होळी यांनी आदिवासी विभागाद्वारा आश्रमशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये या क्रिडा संमेलनाच्या माध्यमातून क्रिडा गुण जोपासन्यास मदत होते. आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये तर उपजत क्रिडा गुण असतात या क्रिडागुणांना योग्य वाव मिळाल्यास राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू तयार करण्यास मदत होते. तसेच विद्यार्थ्यानी अभ्यासाबरोबरच क्रिडा गुणांची जोपासना केल्यास समृध्द आरोग्याबरोबरच अभ्यासात सुद्धा यशस्वी होण्यास मोलाची मदत होते. त्यामुळे विद्यार्थ्यानी क्रिडा स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर खिलाडी वृत्ती जोपासावी असे प्रतिपादन केले यावेळी उपस्थित सुरेशजी शहा भाजपा बंगली आघाडी जिल्हाध्यक्ष, दिलीपजी चलाख जिल्हा सचिव, साईनाथजी बुरांडे किसान मोर्चा महामंत्री,सौ.सुरेखाताई गेडाम सरपंचा ग्रा.प.रेगडी डॉ.मेश्राम साहेब, प्रशांत शाह,संतोष कन्नाके सर,मुकेश गेडाम सर, वाडीघरे सर,रमेश तिम्मा सर, विलास कुळमेथे सर,बहिरेवर सर,दोनाडकर सर,कुसराम सर,शेळके सर,भाजीपाले मॅडम,चुनारकर मॅडम,पठाण सर,पेंदाम सर,गोटा सर विविध पदाधिकारी व अधिकारी वर्ग उपस्थित राहिले.