एटापल्ली येथे भाजपाचा सेवा पंधरवडा कार्यक्रम व तालुका कार्यकारिणी विस्तारित बैठक संपन्न…

69

बैठकीला तालुक्यातील भाजपा पदाधिकारी उपस्थिती

एटापल्ली विशेष प्रतिनिधी 

एटापल्ली – दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोजी एटापल्ली येथील शासकीय विश्राम गृह मध्ये एटापल्ली तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करून सेवा पंधरवडा कार्यक्रम 2025 व तालुका कार्यकारिणी विस्तारित बैठक पार पडली.
या बैठकीत मुख्य उपस्थिती मान. डॉ. देवरावजी होळी साहेब, माजी आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भाजपा यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीत एटापल्ली तालुक्यात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर देशाचे प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिना पासून ते महात्मा गांधीजी यांच्या जयंती पर्यंत गावागावात जाऊन भाजपचे लोकपयोगी कार्य घराघरात पोहचवणे, मराठा आंदोलन यशस्वी करण्यासाठी घेतलेली भूमिका, तसेच आगामी जि. प., पं. स. तसेच नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीत भाजपा पक्षाची काय राजकीय दिशा राहील यासंदर्भात सविस्तर चर्चा व मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित भाजप कार्यकर्त्यांना माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी मार्गदर्शन करून येणाऱ्या स्थानीय स्वराज संस्थेच्या निवडणुकीत संपूर्ण ताकदीने उतरून तालुक्यातील 4 झेडपी व पं. स., तसेच नगर पंचायत वर कशाप्रकारे पक्षाची सत्ता आणता येईल याबद्दल मार्गदर्शन केले. त्यासाठीच आतापासूनच सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी कामाला लागणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन या वेळी केले.
या प्रसंगी एटापल्ली येथे सेवा पाधरवाडा कार्यक्रम व तालुका कार्यकारिणी विस्तारित बैठकिला तालुका अध्यक्ष- प्रसाद पुल्लूरवार, ता.महामंत्री बाबला मजुमदार, जिल्हा सचिव- मोहन नामेवार, सम्मा जेट्टी, राकेश बीरमवर, मनोहर भडके, राजेश रविकांतीवर, सागर मंडल, बालाजी मोहुर्ले, देबरत गाईन, प्रशांत आत्राम, राकेश हिरा, मोहनजी नामेवार, संपत पांडकुलवार, बी गम्पावर, आनंद बिस्वास, हरीश कुमरे, आशिष कांबले, व्ही जंबेवार सह बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. या सेवा पंधरवडा अभियानाच्या माध्यमातून समाजसेवेचा संकल्प करत भाजपा गडचिरोली जिल्हा दृढपणे पुढे जात असल्याचा विश्वास जनतेमध्ये जात आहे.