२०००कोटींच्या आलिशान महलात राहुन आंबेडकांचे स्वप्न पुर्ण करणे अशक्य ! राजरतन मेश्राम …

128

जिल्हा प्रतिनिधी सतीश कुसराम

देसाईगंज :

देशात व मुख्य:ता महाराष्ट्रात डॉ बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ तळागळातील वंचित समाज समजु लागला आहे. बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडी ला समाजाच्या सर्वच स्तरातुन पाठिंबा मिळत असल्याने आंबेडकरांच्या नावाचे राजकारण करणारे काही सुपारीबाज पक्ष स्व:ताचे अस्तीत्व टिकवुन ठेवण्यासाठी मिशन या नावाखाली समाजाची दिशाभूल करत असले तरी २००० कोटींच्या आलेशान महलात राहुन आंबेडकरी चळवळ चालविल्या जाऊ शकत नाही असे परखड मत वंचित बहुजन आघाडी चे गडचिरोली जिल्हा महासचिव राजरतन मेश्राम यांनी व्यक्त केले . ९० च्या दशकात व्ही पी सिंगांचे सरकार असतांना मंडल आयोगाची सिफारस करण्यात वंचित बहुजन आघाडी चे प्रणेचे एड् बाळासाहेब आंबेडकरांचा सिंहाचा वाटा होता .कैबिनेट मंञीपद नाकारुन बाळासाहेबांनी मंडल आयोग लागु करण्यासाठी व्ही पी सिंगांना प्रेरीत केले माञ या देशातील कॉंग्रेस बीजेपी ने सरकार पाडले पण मंडल आयोग लागू करु दिला नाही.डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा नातू म्हणुन देशभरात पक्ष बळकटी चे प्रयत्न न करता ज्या ज्या राज्यात आंबेडकरांची चळवळ चालविली जात आहे त्या त्या राज्यातिल चळवळीच्या नेत्यांचे मनोबल वाढविण्याचे काम केले माञ कालांतराने त्या पक्षांनी भाजपशी हातमिळवणी केली व सत्ता भोगली माञ रक्तात खरा आंबेडकरवाद नसल्याने त्यांनी भ्रष्टाचाराचा मार्ग अवलंबून चळवळ संपुष्टात आणली २००० कोटींच्या आलेशान बंगल्यात राहुन आंबेडकरांच्या नावाने समाजाची दिशाभूल होत असल्याने एकेकाळचा राष्ट्रीय पक्ष असलेल्या तथाकथीत पक्षाने लोकसभेत साधा भोपळा फोडण्याची लायकी ठेवली नाही खुल्या मंचावरुन भाजप ला कशी मदत करता येईल अशीच रणनिती आखली . उलट बाळासाहेब आंबेडकरांना च भाजपची बी टिम असा अपप्रचार केला . माञ समाज आता सत्य ओळखु लागला आहे. महाबोधी बुद्ध विहार बोधगया आंदोलन सोमनाथ सुर्यवंशी हत्या प्रकरणात थेट सुप्रिम कोर्टात लढा उभारला, नागपुरच्या दिक्षाभूमी अंडरग्राऊंड पार्कींग विरोधात आंदोलन, ७८ लाख मतदान वाढीचे प्रकरण मराठा आरक्षणाच्या प्रकरणात ओबीसींचे हक्क अबाधित राहण्यासाठी केलेल्या सुचना यावरुन महाराष्ट्रात बहुजनांची वंचितांची चळवळ खर्या अर्थाने फक्त बाळासाहेब आंबेडकरच चालवित आहेत हे सत्य समजल्याने ओळखल्याने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात एस सी एस टी ओबीसी व मुस्लिम समाज बाळासाहेबांना पाठिंबा देत आहेत तर दुसरीकडे सुपारीबाज पक्ष आंबेडकरी मुव्हमेंट संपविण्यासाठी भाजप चे हस्तक बनुन काम करत आहेत .२००० कोटींच्या आलीशान बंगल्यात राहुन फक्त आपल्या परिवारासाठी संम्पत्ती गोळा करता येत असली तरी आंबेडकरी चळवळ चालविता येऊ शकत नाही असे परखड मत राजरतन मेश्राम यांनी व्यक्त केेले .