मूल येथील नवभारत विद्यालयात शिक्षकदिन संपन्न…

138

प्रतिनिधी गौरव मोहबे

मूल :- स्थानिक नवभारत विद्यालय तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात भारताचे द्वितीय राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षकदिन म्हणून उत्साहात पार पडला.

यावेळी प्राचार्य अशोक झाडे यांनी कै.डॉ. राधाकृष्णन यांचे प्रतिमेला पुष्पहार घालून व दिप प्रज्वलन करून अभिवादन केले.

प्रा.महेश पानसे, प्रा.किसन वासाडे,सुपरवायझर सौ. वर्षा भांडारकर यांनी प्रतिमेचे पुजन करुन आदरांजली वाहिली.

प्रा.अशोक झाडे यांनी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचे अपेक्षित कार्य व भविष्यातील आवाहने विषद करून नवीन शैक्षणिक धोरणानुसार भविष्यात आपले शैक्षणिक कार्य पार पाहण्याकरिता सज्ज होण्याचे आवाहन उपस्थित शिक्षकांना केले.

यावेळी प्रा.विजय काटकर, प्रा.पुस्तके, प्रा.येलमूले, प्रा.उगेमुगे शिक्षक सर्वश्री निलेश मानकरी, श्री.मोडक प्रा. बोलीवार,प्रा.संजय येरोजवार, प्रा.धोटे श्री. मोडक, श्री. सलाम, श्री. निमसरकार, अनिल खोब्रागडे, श्री. आनंद फडके यांचेसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आवर्जून उपस्थित होते.

यावेळी सौ.भांडारकर यांनी प्रा.महेश पानसे यांना बेलाचे तर पि.डी.धोटे यांना पारिजातकाचे रोपटे देऊन शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्यात.