रांगोळीतून साकारला “बाप्पाचे”अप्रतिम चित्र…..

124

प्रतिनिधी गौरव मोहबे:

सिंदेवाही ( शिवणी) :- गणेशउत्सवा निमित्त महात्मा फुले गणेश मंडळ शिवणीच्या वतीने विविध कला गुणांना वाव मिळावा व वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रकलेची, रंगकामाची गावातील, परिसरातील विद्यार्थाना ,कलाकारांना माहिती मिळावी यासाठी गणपती बाप्पाचे रांगोळीने अप्रतिम असे चित्र साकार करून गावातील सर्व भाविकांचे मन मंडळाने जिंकले.

ही रांगोळी कुनघाडा (रै) येथील प्रसिद्ध चित्रकार अजय भांडेकार व त्यांचे सहकारी आशिष कोठारे यांनी रेखाटली आहे.

या आयोजनाच्या यशस्वीते करिता, आर्थिक सहाय्य सुजल सुधीरजी चले यांनी केले तर मंडळांचे अध्यक्ष श्री पप्पू दडमल व त्यांचे सहकारी यांचे विशेष सहाकार्य लाभले.

रांगोळीतून बाप्पा ची कलाकृती संपूर्ण सिंदेवाही तालुक्यात आकषंणाचा विषय ठरली आहे. गाव खेड्यातील कलावंत सजीव आहेत हे या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट होते.

रांगोळीतून बाप्पाची मनमोहक व आकर्षक कलाकृती बघण्याकरीता परिसरातील जनता मोठ्या भक्तीभावाने शिवणी गावात गरीब करीत आहे.