मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात येऊ नये :ओबीसी समाज संघटनेची मागणी…

80

उपविभागीय आधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना पाठविले निवेदन

प्रतिनिधी नितेश खळसे देसाईगंज:
महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणावरून सुरु असलेल्या आंदोलनावर आम्हाला चिंता आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत कोणताही निर्णय घेतल्यास त्याचा थेट परिणाम ओबीसी समाजावर होणार आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला असंविधानिक पद्धतीने ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्याच्या विरोधात आहोत.म्हणून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात येऊ नये अशी मागणी ओबीसी समाज संघटना देसाईगंज यांच्या वतिने उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
शासनाने तात्काळ जातीनिहाय जनगणना करावी, जेणेकरून प्रत्येक समाजाची लोकसंख्या आणि त्यांची सामाजिक, आर्थिक स्थिती स्पष्ट होईल.५०% आरक्षणाची मर्यादा हटवून लोकसंख्येच्या प्रमाणात सर्वांना आरक्षण द्यावे,शासनाने मराठा आंदोलकांच्या दबावाखाली कोणताही निर्णय घेऊ नये आणि ओबीसीसमाजाच्या आरक्षणाचे रक्षण करावे. मागण्यांचा विचार न झाल्यास, नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये विराट मोर्चा आणि आमरण उपोषण करण्याची तयारी केली आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाचे संरक्षण करणे हे शासनाचे कर्तव्य आहे आणि आम्ही अपेक्षा करतो की आपण यावर सकारात्मक निर्णय घ्याल,अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदन देतेवेळी ओबीसी समाज संघटना तालुका देसाईगंजचे अध्यक्ष लोकमान्य बरडे, पंकज धोटे,सुनील पारधी, धनपाल मिसार ,माणिक पिलारे,सदाराम ठाकरे, कल्पना कापसे,पुरुषोत्तम देशकर ,सागर वाढई, विलास ठाकरे, ज्ञानदेव पिलारे,परशुराम ठाकरे,रोशन ठाकरे, पुरुषोत्तम उरकुडे ,प्रशांत देवतळे,प्रदीप तुपट, दिगांबर भजनकार, मोरू मोहुर्ले, जावेद शेख,विनायक अनोले, धनराज अहिरकर,गौरव शिलार,रोशन कवासे आदी उपस्थित होते.