महाराष्ट्राची सुसंस्कृती व परंपरा नागरिकांनी कायम जोपासावी- विधीमंडळ काॅंग्रेस पक्षनेते आ.विजय वडेट्टीवार
संपादक प्रशांत बिट्टूरवार:
ब्रम्हपूरीच्या गणेशोत्सवात विदर्भस्तरीय दहीहंडी उत्सव साजरा
सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. अशातच एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या सुखदुःखात सहभागी होत असतांनाच सर्व जाती-धर्मीयांच्या सण उत्सवात पुढाकार घेऊन सार्वजनिकरित्या सण-उत्सव साजरे करणे हे देखील माझे कर्तव्य आहे. मात्र सण उत्सवात सहभागी होत असतांनाच नागरिकांनी महाराष्ट्राची सुसंस्कृती व परंपरा कायम जोपासावी असे आवाहन महाराष्ट्र विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते, काॅंग्रेस विधीमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.

ब्रम्हपूरीचा महाराजा गणेश उत्सव मंडळाच्या वतीने विदर्भस्तरीय दहीहंडी उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार डॉ नामदेव किरसान हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ देविदास जगनाडे, अॅड राम मेश्राम, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, कृउबा सभापती प्रभाकर सेलोकर, माजी जि.प.सदस्य डॉ.राजेश कांबळे, माजी जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर, शहर काँग्रेस अध्यक्ष हितेंद्र राऊत, माजी नगराध्यक्षा वनिता ठाकूर, प्रदेश काँग्रेस महासचिव आसिफ कुरेशी, प्रदेश काँग्रेस सचिव डॉ.थानेश्वर कायरकर, माजी पं.स.सभापती नेताजी मेश्राम, माजी नगरसेवक डॉ.नितीन ऊराडे, जिल्हा काॅंग्रेस उपाध्यक्ष मोंटु पिलारे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष योगेश मिसार, सुमीतभाई उनाडकर, जिल्हा काॅंग्रेस सचिव वासुभाऊ सोंदरकर, जिल्हा काॅंग्रेस सहसचिव मोहम्मद गाजी पटेल, शहर काँग्रेस सचिव मुन्ना रामटेके, इक्बाल जेसानी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विविध जिल्ह्यांतील गोविंदा पथकांनी या दहीहंडी मध्ये सहभाग दर्शविला होता. गोविंदांनी रिंगणात तयार केलेले चित्तथरारक मानवी मनोरे बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. दहीहंडीच्या सर्व बक्षीसांचे प्रायोजक विधीमंडळ काॅंग्रेस पक्षनेते, आमदार विजय वडेट्टीवार हे होते.
या स्पर्धेचा प्रथम पारितोषिक १ लाख ११ हजार १११ रू. आदीशक्ती शितलामाता गृप भंडारा यांनी पटकावला. तर द्वितीय पारितोषिक ५५ हजार ५५५ रू. शितलामाता गृप चंद्रपूर यांनी पटकावला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे यांनी केले. तर सुत्रसंचलन युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुरज मेश्राम व राहुल मैंद यांनी केले. यशस्वीतेसाठी ब्रम्हपूरीचा महाराजा गणेश उत्सव मंडळाचे पदाधिकारी, युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोलाचे सहकार्य केले.
पुष्पा फेम अजय मोहीते यांची विशेष उपस्थिती यावेळी होती. पुष्पा चित्रपटातील गाण्यांवर थिरकत डायलॉगचे सुंदर प्रदर्शन करून त्यांनी उपस्थितांचे मने जिंकली. सोबतच नागपूरातील डिजे अलायशा हिने सुध्दा नृत्य सादरीकरण केले.







