प्रतिनिधी सतीश कुसराम:
गडचिरोली:
*!!गडचिरोली जिल्ह्यातील पुरपरीस्थीती यशस्वी पणे सांभाळण्यात जिल्हाधिकारी अविश्यांत जी पंडा यशस्वी!!*
भारतीय संविधानामध्ये ३ पदे हे संविधानिक आहेत. पी.एम, सी एम, व डी एम, डी एम म्हणजे डिस्टिक मॅजिस्ट्रेट अर्थात जिल्हाधिकारी आणि यांना विशेषता जिल्ह्यात सर्वदृष्टीने विकास करणे, प्रशासन सांभाळणे, नैसर्गिक परिस्थितीला सामोरे जाणे, सगळ्याच परिस्थितीत जनतेला सुखी व त्यांचा विकास होईल याच करिता 24 तास विचार करावा लागतो. जिल्हाधिकारी हे किती जबाबदारीची व संवेदनशील पोस्ट आहे. हे नुकत्याच गडचिरोली येथे झालेल्या 3 दिवसाच्या मुसळधार पावसाच्या व पुरा पाण्याच्या परिस्थितीत गडचिरोली जिल्ह्यातील अतिशय मागास असलेला भामरागड, सिरोंचा इथे आलेल्या पुराला यशस्वीपणे तोंड दिले. परिस्थिती कितीही जरी बिकट असली तरी निर्धाराने ती दूर करू शकतो फक्त अधिकाऱ्यांचा निर्धार पक्का असावा यात गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिशांत पंडा हे यशस्वी झाले आहेत.या भामरागड व सिरोंचा भागातील आदिवासी असे म्हणतात गडचिरोली जिल्हाधिकारी ता “आदिवासी हाटी कबड बेस मंता”
पावसाच्या व अतीवृष्टी आणि नदीच्या पातळीत पाण्याची वाढ झाल्याने जी संभाव्य परिस्थिती उपस्थित होतो. या बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागते. गडचिरोलीत पण अशी स्थिती या तीन-चार दिवसात उद्भवली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी गडचिरोली जिल्ह्यात IRS (Incident Response System) ही प्रणाली लागू करून जिल्हा प्रशासनाने आपत्कालीन परिस्थितीत अतिशय चोक व चांगला समन्वय राखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय केला. आय आर एस प्रणालीनुसार पूरस्थितीत विविध विभागाला जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.यानुसार धरण नदी आणि तलावाचा दर तासाने डेटा अद्यावत करून तांत्रिक विश्लेषण करणे, समन्वय राखणे, बंद झालेले रस्ते व संपर्क तुटलेल्या गावांची माहिती अद्यावत करणे, बॅरिकेट्स लावणे, व अडथळे दूर करणे, विद्युत पुरवठा, दूरसंचार सेवा खंडित झालेल्या गावाची माहिती गोळा करून तातडीने दुरुस्ती करणे, गॅस ,पेट्रोल, भाजीपाला, अन्नधान्य याचा पुरवठा सुरळीत ठेवणे, आरोग्य व्यवस्था कार्यान्वित ठेवून ,साथरोग प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना करणे, सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करून निर्जंतुकीकरणाची सोय करणे, पूरग्रस्त नागरिकांना शेल्टर होम मध्ये स्थलांतरित करून मूलभूत सुविधा पुरवणे, पूरस्थितीचे दैनिक अहवाल तयार करणे, घरे, शेती, आणि शासकीय मालमत्तेच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करणे इत्यादी कामाचा या प्रणालीमध्ये समावेश आहे.
जिल्ह्यातील वैनगंगा, प्राणहिता, इंद्रावती, व गोदावरी, या प्रमुख नद्या इशाराच्या पातळीच्या वर वाहत आहेत भारतीय हवामान विभागाने मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वातील जिल्हा प्रशासनाने तयारी वाढवून उपयोजना सुरू केले आहे. दरम्यान मेडिकट्टा बॅरेजचे सर्व ८५ गेट उघडून तब्बल 10 लाख 7 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे कोणतीही आपत्तीजनक परिस्थिती उदभवल्यास त्याचा सामना करण्यासाठी एनडीआरएफ चे पथक बुधवारी पहाटे 5 वाजता सिरोंच्यात दाखल झाले आहे.जिल्हाधिकारी यांनी प्रयत्न पुर्वक,व आपले कौशल्य वापरुन NDRF पथक मागवुन घेतले या करीता जिल्हाधिकारी यांना रात्रभर जागरण करावे लागले.
*SDRF च्या मदितीने जिल्हाधिकारी यांनी दिल्ली येथे परिक्षा देणा-याना पुरातुन काळले सुखरुप!!*
गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील पर्लकोटा नदीच्या पुरामुळे 4 दिवसापासून गावातच अडकून पडलेल्या एकलव्य शाळेतील 4 शिक्षकांना अखेर जिल्हाधिकारी यांच्या प्रयत्नाने प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन पथकाने सुरक्षितपणे पुरातून बाहेर काढले , हे शिक्षक दिल्ली येथे 23 ऑगस्ट रोजी होणाऱ्या केंद्र सरकारच्या दिल्ली साबाॅर्डिनेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या(DSSSB) परीक्षेसाठी जाणार होते. त्यांना एसडीआर एफ च्या टीमच्या मदतीने मोटार बोटच्या माध्यमातून पर्लकोटा नदीच्या पुरातून हेमलकसा येथे पोहोचविण्यात आले ते दिल्लीच्या दिशेने रवाना पन झाले आहेत. या चार शिक्षकांमध्ये तीन महिला शिक्षकांचा समावेश होता. 23 ऑगस्टला दिल्लीत परीक्षा असल्याने त्यांना 20 ऑगस्ट पर्यंत निघायचे होते. पण पर्यकोटा नदी चे पाणी चार दिवसापासून पुलावरून वाहत असल्याने त्यांना तिथून बाहेर पडणे शक्य झाले नाही, ही बाब जिल्हाधिकारी श्री अविशांत पंडा यांच्या निदर्शनास आल्याबरोबर विशेष मोहीम राबवून राज्य आपत्ती प्रतिसाद पथकाच्या मदतीने मोटार बोटीद्वारे त्यांना पर्लकोटा नदी पार करून हेमल कसा येथे पोहोचण्यात आले त्यानंतर हे शिक्षक पुढे दिल्लीच्या प्रवासासाठी रवाना झाले आहेत या शिक्षकांनी व भामरागड येथील आदिवासी व सर्व जनतेने जिल्हाधिकारी श्री अविशांत पंडा यांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले आहे.
*!!आरेवाडा येथील आरोग्य सेविकेची हेलिकॉप्टर पाठवुन आरोग्याची काळजी घेणारे जिल्हाधिकारी!!.
भामरागड तालुक्यातील आरेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत कंत्राटी आरोग्य सेविका सीमा बांबोडे यांची आजारपणामुळे प्रकृती गंभीर झाली होती. त्यामुळे योग्य उपचारासाठी त्यांना गडचिरोलीत आणणे गरजेचे होते. जिल्हाधिकारी, गडचिरोली. यांना कडताच त्यांनी पोलीस विभागाचे आपले हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिले त्यामुळे सीमा बांबोडे यांना वेळीच गडचिरोलीला आणून त्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यात आली व त्यामुळे आता त्यांची प्रकृती सुधारली आहे
गडचिरोली जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून मुसळधारपणे कोसळत असलेल्या पावसामुळे आणि पर्लकोटा नदीला आलेल्या महापुरामुळे भामरागड सह एकूण 112 गावांचा गडचिरोलीशी संपर्क तुटला आहे. जिल्हाधिकारी गडचिरोली अतिशय संवेदनशील कार्य करतात याचा हा जिवंत उदाहरण आहे. एक कंत्राटी आरोग्य सेवेकेची प्रकृती खराब असल्याने चक्क हेलिकॉप्टर पाठवून तिला गडचिरोली येथे रुग्णालयात भरती करून एका आरोग्य सेवीका कर्मचाऱ्याबद्दल एवढी संवेदनशीलता दाखवणारे जिल्हाधिकारी गडचिरोली यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
*भारत माता की जय*
*







