*गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे पदाधिकारी व सदस्य निवडीस प्रारंभ!*

146

 

दिनांक 17 ऑगस्ट 2025 गडचिरोली
गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणी यांनी राष्ट्रीय मानवाधिकार संघठन असोसिएशन नई दिल्ली यांच्या परवानगीने घेतलेल्या नवीन ठरावानुसार गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये राष्ट्रीय मानवाधिकार संघठन (असो )नई दिल्ली महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ प्रणय भाऊ खुणे यांच्या आदेशान्वये नवीन सदस्य व पदाधिकारी निवड करण्याचे कामाची सुरुवात करण्यात आलेली आहे यामध्ये प्रामुख्याने महिला आघाडी,युवा आघाडी, कामगार आघाडी, वाहन चालक आघाडी,
किसान आघाडी व विविध आघाड्यांमध्ये राष्ट्रीय मानवाधिकार संघटना पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात येत आहे व गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तालुका कार्यकारिणी बैठक घेऊन नवीन तालुका कार्यकारणी गठीत करून पदाधिकारी यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे त्याआधी संघटनेचे सदस्य होणे अनिवार्य तरी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी यांनी ज्यांना प्रामाणिकपणे विविध सामाजिक कार्य करण्याची इच्छा आहे त्यांनी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रमेश अधिकारी व महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा मनीषा मडावी, जिल्हा सचिव प्रकाश भाऊ थुल यांचेशी थेट संपर्क साधावे असे आवाहन करण्यात आले आहे,