Home Breaking News दारू सोडायला गेले आणि जीव गमवून बसले… गुळगाव येथील दोघांचा मृत्यू;...

दारू सोडायला गेले आणि जीव गमवून बसले… गुळगाव येथील दोघांचा मृत्यू; दोघे गंभीर….

815

भद्रावती : तालुक्यातील गुळगाव येथे दारू सोडण्याची औषध घेतल्याने दोघांचा मृत्यू तर दोघे गंभीर अवस्थेत उपचार घेत आहेत.ही घटना तालुक्यातील गुळगाव येथे घडली. सहयोग सदाशिव जीवतोडे (वय १९) , प्रतीक घनश्याम दडमल (वय २६) राहणार गुळगाव अशी मृतकांची नावे आहे. सदाशिव पुंजाराम जीवतोडे (वय ४५) , सोमेश्वर उद्धव वाकडे (३५) यांच्यावर उपचार सुरू आहेत. चारही व्यक्ती (ता.२१) रोजी वर्धा जिल्ह्यातील शेडेगाव येथे शेळके महाराज या वैद्याकडून दारू सोडण्याचे औषध घेतले.त्यानंतर सायंकाळी ते गावी परत आले. त्यानंतर चौघांचीही अचानक तब्येत खराब झाली.त्यामुळे त्यांना भद्रावती येथे उपचारासाठी खाजगी रुग्णालयात आणले.त्यादरम्यान दोघांचा मृत्यू झाला तर दोघांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना मिळाली.घटनेचा पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात भद्रावती येथे शवविच्छेदनासाठी दाखल केले. दारू सोडण्याचे औषध देणारे वैद्य शेळके महाराज यांना समुद्रपुर पोलीस स्टेशन अंतर्गत चौकशीकरीता ताब्यात घेतले आहे. सदर घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे. तपासाअंतीचा अहवाल समुद्रपुर पोलीस स्टेशन कडे पाठविण्यात येईल,असे ठाणेदारांनी सांगितले आहे.

Don`t copy text!