Homeचंद्रपूरकोरपनाभरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण जागीच ठार गडचांदुर येथील संविधान चौकातील...

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण जागीच ठार गडचांदुर येथील संविधान चौकातील (बसस्टॉप) घटना

कोरपना: तालुक्यातील गडचांदुर येथे भरधाव ट्रकच्या धडकेत युवक जागीच ठार झाल्याची घटना घडली. ही घटना बुधवारी (ता.3 रा. विसापूर) दुपारी 1.30 च्या सुमारास संविधान चौक येथे घडली. मारुती डोईफोडे (वय 29) असे मृत युवकाचे नाव आहे. मृतक मारुती हा कामानिमित्त गडचांदूर येथे आला.त्याचे काम आटोपल्यानंतर घरी जाण्यासाठी निघाला. मात्र, काळाने त्यांच्यावर घात केला.तो घराकडे जात असताना पुढे अचानक कार आली. कारला साईड देत असताना त्याच बाजूने भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा दुदैवी मृत्यू झाला. घटनास्थळी गडचांदुर पोलीस दाखल झाले.घटनेचा पंचनमा करण्यात आला. पुढील तपास गडचांदूर पोलीस करीत आहे. त्याच्या निधनाने कुटुंबात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!