Homeचंद्रपूरकोरपनादुचाकीच्या भीषण अपघातात युवकाचा जागीच मृत्यू.... खीर्डी येथील घटना...

दुचाकीच्या भीषण अपघातात युवकाचा जागीच मृत्यू…. खीर्डी येथील घटना…

कोरपना:तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या खिरडी येथे दुचाकीच्या भीषण अपघातात युवकाचा जागीच मृत्यू झाला.ही घटना सोमवारी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. निखिल महादेव कोंडेकर (वय 23) रा. विसापूर असे मृतक युवकाचे नाव आहे.

आज सायंकाळी 8 वाजताच्या सुमारास खिर्डी (फाटा) येथे ही घटना घडली. मृतक निखिल दुचाकीवर एकटाच प्रवास करीत होता. राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला. यात निखिलचा दुदैवी मृत्यू झाला.तेथील मुख्य महामार्गावर कुठलीच वस्ती नाही. त्यामुळे हा अपघात कसा झाला, कुठल्या वाहनाने धडक दिली  याची अजून माहिती मिळाली नाही. घटनेची माहिती नागरिकांना कळताच घटनास्थळावर नागरिकांची एकच गर्दी झाली. सदर घटनेची माहिती गडचांदुर पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करण्यात आला. पुढील तपास गडचांदूर पोलीस करीत आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!