HomeBreaking Newsलोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील ३ जण ठार १ जखमी

लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील ३ जण ठार १ जखमी

प्रितम गग्गुरी(उपसंपादक)

चामोर्शी : लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकने जबर धडक दिल्याने मोटारसायकल वरील एकाच कुटुंबातील तिघे जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. सदर घटना २५ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास चामोर्शी येथील नवीन तहसील कार्यालयाजवळच्या वळणावर घडली.

माहितीनुसार, भावना नरेंद्र जंधलवार (४५), रुद्र गणेश जंधलवार (४) व प्रियंका गणेश जंधलवार (२७) अशी मृतांची नावे असून, नरेंद्र जंधलवार (५३) हे गंभीर जखमी झाले. प्रियंका व रुद्र हे मायलेक असून, भावना ही नरेंद्र जंधलवार यांची पत्नी आहे. भावना आणि नरेंद्र भावना हे प्रियंकाचे चुलत सासू-सासरे आहेत.

सर्वजण चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथील रहिवासी आहेत. प्रियंकाचे पती गणेश जंधलवार यांचे महिनाभरापूर्वी निधन झाले. त्यामुळे विधवांना मिळणाऱ्या शासकीय सवलतीचा लाभ घेण्याविषयीचा अर्ज भरण्यासाठी हे कुटुंब आज तहसील कार्यालयात आले होते. काम आटोपून मोटारसायकलने गावाकडे परत जात असताना लोहखनिज घेऊन येणाऱ्या सीजी ०८ एयू ९०४५ क्रमांकाच्या ट्रकने त्यांना जबर धडक दिली. ट्रकने मोटारसायकलला दहा ते पंधरा फूट फरफटत नेले. यात भावना व रुद्र यांचा जागीच ठार, तर प्रियंका हिचा गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. नरेंद्र गंधलवार यांची प्रकृती चिंताजनक आहे.

अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पोबारा केला. अपघात भयावह असल्याने पोलिस निरीक्षक विजयानंद पाटील आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. त्यांनी जेसीबीच्या साह्याने मृतदेह बाहेर काढले. यावेळी नागरिकांनी एकच गर्दी करुन रोष व्यक्त केला.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!