HomeBreaking Newsबापरे....मृत्यूचा तांडव...! समृध्दी महामार्गावर लक्झरी बसचा भीषण अपघात;25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू......

बापरे….मृत्यूचा तांडव…! समृध्दी महामार्गावर लक्झरी बसचा भीषण अपघात;25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू… दुर्घटना कशी घडली? सविस्तर वाचा….. -विशाल शेंडे

बुलढाणा: येथील समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्स खासगी लक्झरी बसचा भीषण अपघात झाला.

चालकाला झोप लागल्यामुळं बस थेट डिव्हायरला धडकली. या अपघातात 25 प्रवाशांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. सिंदखेडराजा परिसरात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू होते. बसमधील जखमींना तातडीनं उपचारासाठी बुलढाणा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. बसमध्ये एकूण 33 प्रवासी होते. यातील आठ प्रवासी सुखरुप बाहेर पडले आहेत. ही प्रवासी बस नागपूरहून पुण्याला निघाली होती. त्यावेळी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही भीषण घटना घडली.

या लक्झरी बसमध्ये नागपूर, वर्धा आणि यवतमाळचे प्रवासी होते. ही बस विदर्भ ट्रॅव्हल्सची होती. ही बस सिंदखेडराजा जवळ पिंपळखुटा गावालगत समृध्दी महामार्गावर रस्ता दुभाजकाला धडकली आणि त्यानंतर बसने पेट घेतला. डिझेलच्या संपर्कात आल्याने बसने वेगाने पेट घेतला. यात 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. प्रवासी गाडीच्या काचा फोडून आले बाहेरही बस पहिल्यांदा लोखंडी पोलला धडकली. त्यानंतर ही बस रस्ता दुभाजकाला धडकली. त्यानंतर बस पलटी झाली. बसचा दरवाजा गाडीखाली आल्यानं कोणालाच बाहेर येता आलं नाही. वाचलेले प्रवासी गाडीच्या काचा फोडून बाहेर आले.यात 25 जणांचा दुदैवी मृत्यू झाला, यामध्ये 4 मुलांचाही समावेश आहे.

बसचे दार खाली दबले पोलीस आणि घटनास्थळी असलेल्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, बस सर्वात आधी नागपूरवरून औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर उजवीकडे एका लोखंडी पोलला धडकली. अनियंत्रित होऊन पुढं जाऊन येणाऱ्या आणि जाणाऱ्या दोन्ही लेनच्या मध्ये असलेल्या काँक्रिटच्या दुभाजकाला धडकली आणि पलटली. बस पलटी होताना डाव्या बाजूने पलटली. त्यामुळं बसचे दार खाली दाबले गेले. त्यामुळं लोकांना बाहेर पडण्यासाठी मार्ग नव्हता. अपघातानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर बसमधील डिझेल सांडले आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!