Homeचंद्रपूरभद्रावती१ लाख किंमतीचे बोगस कपाशीचे बियाने जप्त.... भद्रावती येथील घटना; दोन...

१ लाख किंमतीचे बोगस कपाशीचे बियाने जप्त…. भद्रावती येथील घटना; दोन आरोपींना अटक…

भद्रावती: शहरातील टप्पा परिसरातील जगन्नाथ बाबा कृषी केंद्रात कृषी विभाग व भद्रावती पोलिसांनी कारवाई करीत दुकानातील एक लाख किंमतीचे बोगस कपाशीचे बियाने जप्त केले आहे.या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. केंद्र संचालक महेश वांढरे व सहकारी दीपक हरिदास गेडाम अशी त्यांची नावे आहेत. भद्रावती येथील जगन्नाथ बाबा कृषी केंद्रामध्ये कापूस जातीचे बोगस बियाणे विक्रीसाठी ठेवल्याची गुप्त माहिती मिळाली त्या आधारे जिल्हा गुणवत्ता निरीक्षक कृषी विभाग श्रावण बोढे व भद्रावती पोलीस यांनी संयुक्त कारवाई करीत केंद्रावर धाड टाकली. यात 129 पाकीट बियाणे किंमत एक लाख असा माल जप्त करण्यात आला.यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली ही कारवाई कृषी अधिकारी श्रावण बोडे, ठाणेदार बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनात सुशांत गाडेवार, अरुण झाडे, पंकज ठेंगणे, पी एस इंगळे ,अनुप आष्टीकर, विश्वनाथ चुधरी,निकेश ठेंगे यांनी केली.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!