Home Breaking News काठीने वार करून महाविद्यालयीन युवकाची हत्या.. वरोरा तालुक्यातील घटना…

काठीने वार करून महाविद्यालयीन युवकाची हत्या.. वरोरा तालुक्यातील घटना…

995

चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील सुर्ला गावाकडे जाणाऱ्या (विकास नगर) परिसरातील वनविभागाच्या जंगलात काठीने वार करुन एका महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या रितेश रामचंद्र लोहकरे (२०) या तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आला.
ही घटना आज, शनिवारी (दि.२०) सकाळी ९.४० वाजताच्या सुमारास घडली. आपापसातील भांडणातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या परिसरातील खुनाची ही तिसरी घटना असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी आरोपीला नागपूर वरून ताब्यात घेतल्याचे समोर येत आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत रितेश लोहकरे हा महाविद्यालयात शिक्षण घेत होता. शनिवारी सकाळच्या सुमारास विकास नगर ( फुकट नगर ) परिसरात रितेश आल्यानंतर त्याला जंगलात नेऊन त्याच्यावर काठीने प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात रितेशचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी फरार झाले. घटनेची माहिती मिळताच वरोरा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे व त्यांची टिम घटनास्थळी दाखल झाली.

चंद्रपूर वरून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट दिली व मार्गदर्शन केले. पंचनाम्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी वरोरा उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासचक्र वेगानी फिरवली. नागपूर वरून मारेकऱ्याला ताब्यात घेतले असल्याचे कळते.

Don`t copy text!