सुरजागड लोहखनिज प्रकल्पाच्या ट्रॅक ने पुनः घेतला एकाचा बळी..

3721

प्रितम गग्गुरी(उपसंपादक)

अहेरी :- सूरजागड लोहखनिज वाहतुकीचे ट्रॅक ने पुनः एकाचा बळी घेतला आहे. मृतकाच नाव वासुदेव मंगा कुलमेथे वय (५०) असून नागेपल्ली येथील रहिवासी असून भगवंतराव हायस्कूल देवलमरी येथे शिक्षक पदावर कार्यरत होते.

आज दुपारच्या सुमारास कुलमेथे हे आपल्या दुचाकीने नागेपल्ली कडे जात असताना मागून येणाऱ्या अवजड माल वाहून नेणाऱ्या ट्रक ने चंद्रपूर मार्गावरील असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र समोर मागून धडक दिल्याने चाका खाली येऊन चिरडले गेल्याने घटनास्थळी ठार झाले. या अपघातानंतर आल्लापल्ली पोलीस चौकी समोर संतप्त लोकांनी या घटनेविषयी रोष व्यक्त केला आहे. अपघातानंतर तणावाची परिस्थिती असून पोलीस लगेच घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपास करीत आहेत.

महिनाभरातील आलापल्ली – चंद्रपूर महामार्गावरील चौथी घटना आहे.