Homeचंद्रपूरचिमूरदुचाकी समोरासमोर धडकल्याने चार जण जखमी

दुचाकी समोरासमोर धडकल्याने चार जण जखमी

चिमूर: राष्ट्रिय महामार्गावरील बंदर जवळ असलेल्या उडान पुलावर दुचाकी समोरासमोर धडकल्याने अपघात झाला. यात चार दुचाकी स्वार जखमी झाले. ही घटना (ता.९) मंगळवारला दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली. जखमीचे नावे सुभाष काशीनाथ चौधरी (वय ४५)त्यांची पत्नी, संगीता चौधरी (वय ३२) मुलगा अंश चौधरी (वय८) रा.अडेगाव (देश) येथील आहे. जखमी सुनिल लक्ष्मण चौधरी (वय ३८) समुद्रपूर तालुक्यातील खेक येथील रहिवासी आहे.जखमी सुनिल चौधरी वय हा गाडी क्रमांक एमएच ३२ ए.जी. ५९४९ ने येत असताना दोघांच्याही दुचाकीची समोरासमोर धडक झाली. अपघतात चवघेही जखमी झाले. त्यांना उपचाराकरीता उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तीथून रेफर करुन नागपूरला हलविण्यात आले. घटनेची माहीती चिमूर पोलिस स्टेशनला देण्यात आली. घटना स्थळावर पोलिस उपनिरिक्षक भिष्मराज सोरते, वाहतुक पोलिस हवालदार रामेश्वर डोईफोडे यांनी घटनेचा पंचणामा केला.पुढील तपास ठाणेदार मनोज गभने करीत आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!