राहत्या घरीच गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या बल्लारपूर येथील घटना; आत्महत्याचे कारण अद्याप कळू शकले नाही.

849

बल्लारपूर. :-बल्लारपूर तालुक्यातील पेपरमिल येथे कंत्राटी या पदावर सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या सिनु तोटापेल्ली (वय ४०)या तरुणाने कन्नमवार वार्ड येथील स्वत:च्या राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवार (ता.२४ )ला सायंकाळच्या सुमारास घडली. कामावरून दुपारी घरी परतल्यानंतर मृतक सिनु तोटापेल्ली हा आपल्या खोलीत झोपायला गेला. सायंकाळ झाला तरी तो बाहेर निघाला नव्हता.त्यामुळेत्याच्या कुटुंबीयांनी रूमचा दरवाजा उघडला असता तो गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला.याची माहीती बल्लारपूर पोलीसांना कळताच पोलीस घटनास्थळावर पोहचले. सदर घटनेचा पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मृत्यूचे कारण अद्याप कळु शकले नाही. मृतक व्यक्तीच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. मृतकावर मंगळवार दुपारी अंत्यविधी करण्यात आली. घटनेचा पुढील तपास बल्लारपूर पोलिस करीत आहे.