Home चंद्रपूर जिवती कातडीची तस्करी करणारी टोळी ताब्यात… आरोपींना तीन दिवसांची वनकोठडी

कातडीची तस्करी करणारी टोळी ताब्यात… आरोपींना तीन दिवसांची वनकोठडी

422

बळीराम काळे, जिवती

जिवती : (तालुका प्रतिनिधी) तेलंगणात वाघाची शिकार करून महाराष्ट्रात कातडीचा विक्रीचा प्रयत्न करीत असताना आरोपीस मध्य चांदा वनविभागातील जिवती तालुक्यातील वन अधिकारी यांनी २ एप्रिलला अटक केली होती.सहा आरोपीच्या तपासातून सहायक वनसंरक्षक श्रीकांत पवार व वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप लंगडे यांच्या मार्गदर्शनात पथकाने व तेलंगाणा वनविभागाने वाघाचे उर्वरित अवयव ताब्यात घेतले.
आरोपीकडून तेलंगणातून वाघाचे वाघनखे,दात व इतर अवयव ३ व ४ एप्रिलला हस्तगत करण्यात आले होते. पाटागुडा येथे वाघाची शिकार करून कातडीची तस्करी करणाऱ्या आंतरराजिय टोळीला मुद्देमालासह ताब्यात घेतले.
विकास माधव गोटमुखले (रा. पाटागुडा,तालुका जिवती, जि.चंद्रपूर), संदीप कोरांगे (रा.आदिमयालजि.आदिलाबाद), इसरू सोनू मडावी (रा.नेटनुर), तिरुपती चिकराम (रा.आदिमयाल), ज्योतीराम पंधराम (रा.केरेगुडा),दोंदेराव चिकराम (रा. केरेगुडा) अशी आरोपींची नावे आहेत.
या सर्वांना तीन दिवसांची वनकोठडी ठोठावण्यात आली आहे.

Don`t copy text!