Homeचंद्रपूरश्याम म्हशाखेत्री (जिल्हा संपादक, चंद्रपुर) यांच्या लेखणीतून 'हरवत असलेले बालपण...'

श्याम म्हशाखेत्री (जिल्हा संपादक, चंद्रपुर) यांच्या लेखणीतून ‘हरवत असलेले बालपण…’

चंद्रपुर: काही कामानिमित्त चंद्रपुर शहरातील बाजारात गेलो. गर्दीतून वाट काढत बाहेर पडताना काही चुमकल्यांचे गोड स्वर कानी पडले आणि त्या आवाजाचा अंदाज लावत गोड चिमुकले असलेल्या ठिकाणी मी पोहचलो. ठिकाण होते चंद्रपूर चे गजबजलेले गांधी चौक. तिथे बघ्यांची गर्दी खूप होती. त्या चुमकल्यांचा गोड आवाज ऐकण्याकरिता पण माझी नजर त्या चिमुकल्या पिलांवर गेली आणि त्या गर्दीत माणसाच्या माणूस शोधायला लागलो..

सविस्तर वृत्त याप्रमाणे की, खरं म्हणजे ही भटकी जमात. कुठेही जाऊन डेरा उभारायचा आणि आपल्या पोटाची भूक मिटवायची हा त्यांचा नित्यक्रम. एकीकडे भारतामध्ये स्वातंत्र्याचा ७५ वा अमृतमहोत्सव साजरा केला. पण भारत सरकार यांना माझा प्रश्न आहे की, ह्या भटक्या जमाती च्या चिमुकल्यांचे हरवत असलेले बालपण आणि त्याचे शिक्षण त्यांना परत मिळेल काय?

शालेय शिक्षण विभाग यांनी कायदा अस्तित्वात आणलेला आहे की एकही मुल शिक्षणापासून वंचित राहू नये. मग खूप मोठा विचार मनात येतो की, आजची पिढी आमच्या देशाचं उज्वल भविष्य ही वास्तविकता आहे काय? विदेशातून चीते आणण्या पेक्षा तेवढाच पैसा ह्या चिमुकल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी खर्च केला तर काय होणार?

राजकारणी नेत्यांनो चार भिंतीच्या बाहेर निघून बघा. आजही देशात भटक्या जमाती चे चिमुकले शिक्षणापासून वंचित आहे. ज्या बालवयात त्यांच्या पाठीवर दप्तराचे ओझ पाहिजे होते. त्या वयात त्यांच्या पाठीवर परिस्थितीचे ओझे आलेले आहेत. तर कश्या अर्थाने स्वतंत्र भारताचे 75 वर्ष आझादी का अमृत महोत्सव साजरा करीत आहे.

या चिमुकल्या मुलांना न्याय मिळेल काय? हरवत असलेले बालपण मिळेल काय? एक संपादक या नात्याने माझी विनंती आहे की, लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणजे प्रसार माध्यमे आहेत. फक्त राजकीय पक्षांच्या बातम्या न लावता, अश्या चिमुकल्यांचे हक्क हिरावले जात असून त्यांच्या भविष्याचा विचार करून त्यांच्यावर होत असलेला अन्याय दूर करण्याकरिता सरकार ला जाग आणण्याचे काम करावे. कारण शेवटी ऐवढेच म्हणावे लागेल

ये आझादी झुटी है, इस देश की जनता भुखी है…

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!