Homeपुणेजेष्ठ पिढी - रुग्णांची काळजी घेणे ही सर्वांची जबाबदारी - डॉ. प्रदिप...

जेष्ठ पिढी – रुग्णांची काळजी घेणे ही सर्वांची जबाबदारी – डॉ. प्रदिप आवटे जागृती डिमेंशिया केंद्रातर्फे जागतिक स्मृतिभ्रंश जनजागरण दिन साजरा….

-सुरज पी. दहागावकर (कार्यकारी संपादक)

पुणे: ‘स्मृती’ ही मनाची आपल्या शरीराची ‘हार्डडिस्क’ आहे ती खराब झाली की स्मृतीभ्रंश डिमेंशिया आणि इतर मानसिक आजार होतात. वय वाढल की अनेकांना हा त्रास होतो. आजच्या हायटेक तरूण पिढीने हे लक्षात घेवून आपली जीवनशैली सुयोग्य ठेवावी आणि समाजातील डिमेंशिया रुग्ण आणि आपल्या जेष्ठ पिढीची काळजी घ्यावी असे आवाहन राज्य आरोग्य सर्वेक्षण अधिकारी व प्रसिध्द कवी डॉ. प्रदिप आवटे यांनी केले.

जागतीक अल्झायमर जन जागरण दिनानिमित्त बुधवारी सकाळी बालगंधर्व रंगमदीर प्रांगणात जागरण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ मानसोपचार तज्ञ डॉ. विद्याधर वाटवे, डॉ. अमर शिंदे, डॉ. प्रीती शिंदे, विजया शिंदे, तसेच डॉ. धर्मेंद्र केंद्रे, डॉ. विजया गोयल, डॉ. अंजली देशपांडे, डॉ. मधुमिता बहाले तसेच चैतन्य पुनर्वसन केंद्राचे प्रतिनिधी प्रिन्स जोस, कर्वे इन्स्टीट्युट समाजकार्य विभागाचे प्रा. चेतन दिवाण, रोटरी क्लब अॅमनोराच्या अध्यक्षा रीया धेंडे, सौ. सरस्वती व्यंकट, मंजु रस्तोगी. इसाईचे श्रीपाद जगताप व हडपसर मेडीकल असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना जेष्ठ मानसोपचार तज्ञ डॉ. विद्याधर वाटवे म्हणाले आजकाल सण किंवा जनजागृती दिवस यात तरुणाई फरक करत नसल्यामुळे स्मृतीभ्रंश किंवा आत्महत्या, छिन्न मनस्कता (स्किझोफ्रेनिया) आणि इतर जनजागरण दिवस उत्सवासारखे साजरे होतात. याबाबत सर्वांनी भान ठेवून व्याधी, आजार आणि त्यावर उपचार करण्याबाबत एकत्रितपणे प्रयत्न करावेत याकडे डॉ. वाटवे यांनी लक्ष वेधले. जागृती डिमेंशिया केंद्राचे डॉ. अमर शिंदे आणि त्यांचे सहकारी सामुहिक जबाबदारीतून मानसिक आजारांवर उपचार आणि जनजागृती करत आहेत. हे काम उल्लेखनिय आहे असेही डॉ. वाटवे म्हणाले.

अल्झायमर अवेअरनेस वॉकेथॉनचे संयोजक आणि जागृती केंद्राचे प्रमुख डॉ. अमर शिंदे यांनी डिमेंशिया किंवा अन्य मानसिक आजार वाढत असले तरी या रुग्णांना वेळेत उपचार दिले, त्यांची काळजी घेतली तर या व्यक्ती ८० वर्षापर्यंत जगू शकतात हे स्पष्ट केले. प्रत्येकाने आपल्या जगण्याचे नियोजन केले पाहीजे. आपली आणि समाजाची काळजी घेतली पाहीजे असे आवाहन डॉ. शिंदे यांनी केले.

डॉ. मधुमिता बहाले यांनी आल्झायमरचा त्रास कोणालाही होवू शकतो याकडे लक्ष वेधले. जेष्ठांची काळजी घेणे, आजारांची लक्षणे दिसताच दुर्लक्ष न करता मदतीचा हात देणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे असे त्या म्हणाल्या. डॉ. धर्मेंद्र केंद्रे यांनी बोलतांना अल्झायमर रुग्ण आणि लहान मुल यांची अवस्था सारखीच असते. स्मृतीभंशाच्या रुग्णांना काय करावे हे समजत नाही. त्यामुळे त्यांना मदत करणे हे आपले कर्तव्य असते याकडे लक्ष वेधून तरूण पिढीवर सामाजिक जाणीवेचे संस्कार करणे गरजेचे आहे तरच आपल्या पिढीचे वृध्दपण सुसय्य होईल असे डॉ. केंद्रे यांनी सांगितले. अन्य निमत्रित उपस्थितांनी रुग्णांच्या कुटूंबानी आपले मनोगत व्यक्त केले..

जागृती केंद्राचे पथनाट्य

स्मृतीभंशाचा त्रास त्याचा कुटूंबावर येणारा ताण आणि त्यावर असणारे उपचार या विषयावर जागृती केंद्राच्या वतीने एक प्रभावी पथनाट्य सादर करण्यात आले. या नाट्यात डॉ. सायली अहिरराव, बाळासाहेब भोसले, सतिश शिंदे, अजय चंदनशिव, श्रीकृष्ण चिखलकर, रेणू पारधी, श्वेता कांबळे, मनोहर हळस, सुरज दहागावकर यांचेसह वृषाली, दिप्ती, तेजल, श्रुती यांनी अभियन करत उपस्थितांची दाद मिळविली व स्मृतीचा संदेश दिला.

बालगंधर्व प्रागंणात इसाई फार्मास्युटीकल्सच्या वतीने व स्मृतीभ्रंश जागरणाचा संदेश देणारी देखणी आणि माहीतीपुर्ण सजावट करण्यात आली होती. यासाठी इसाईचे अपूर्वा गुरव, श्रीपाद जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थित एक हजाराहून अधिक नागरिकांना पुष्पगुच्छ, अल्पोपहार, आणि माहीती पत्रक देवून सर्वांचे आदरातित्य केले. या कार्यक्रमांचे सुत्र संचलन श्रीकृष्ण चिखलकर तर आभार प्रदर्शन डॉ. विजया गोयल यांनी केले.

उत्स्फूर्त वॉकेथॉन
सामाजिक शास्त्र विभागाचे विद्यार्थी शेकडो रुग्ण मोठ्या संख्येने आलेले जेष्ठ नागरीक आणि आरोग्य क्षेत्रात काम करणारे नागरीक यांच्या उत्स्फुर्त प्रतिसादात निघालेल्या वॉकेथॉनला (पदयात्रे) पुणेकरांनी गर्दी करत प्रतिसाद दिला. स्मृतीभ्रंश त्याची लक्षणे, उपाय जाणून घेण्यासाठी अनेक नागरीक सहभागी डॉक्टर मंडळीशी चर्चा करीत होते. या रॅलीत स्मृतीभंशाबाबत जागरण करणारे फलक लक्षवेधी होते. सहभागी झालेल्या तरुणाईने जनजागृतीच्या घोषणा देत जंगली महाराज रोड दणाणून टाकला.

या रॅलीत जागृतीचे व्यवथापक श्री. निरंजन पंडीत, डॉ. कल्याणी कुलकर्णी, डॉ. याज्ञिक पांड्या, डॉ. अमोल कोल्हे, डॉ. सुमन राजपारा, डॉ. नेहा जेस्वानी, श्रुती कवितके, जया तिवारी, योग शिक्षक मिलिंद देशपांडे, जगदिश वडोदे, शिवा साबळे यांचेसह निमंत्रित मान्यवर सहभागी झाले होते. वॉकेथॉन पहाण्यासाठी पुणेकर मंडळींनी वाहने थांबवत सहभाग घेतला.

 

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!