HomeBreaking Newsकोंबडीचा अंडा घशात अडकला; 42 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू 

कोंबडीचा अंडा घशात अडकला; 42 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू 

आहारात अंडी खाल्याने शरीर सुदृढ राहण्यासाठी आवश्यक असणारी अनेक जीवनसत्त्वे (vitamins) मिळतात. अंड्यामध्ये फोलेट म्हणजेच अ, ब १२ ब ५ आणि ब २ ही जीवनसत्त्वे असतात. याबरोबरच फॉस्फरस, सेलेनियम, कॅल्शियम, ओमेगा ३ आणि इतर अनेक महत्त्वाचे घटक असतात. त्यामुळे तंदुरुस्तीसाठी दररोज एक अंडे खाणे अतिशय आवश्यक आहे. मात्र, जेवन करताना घशात कोंबडीचे उकळलेले अंडे अडकल्याने श्वास घेण्यास  ञास होऊन 42 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना विदर्भात घडली. 

आर्णी (Arni Taluka) तालूक्यातील जवळा येथील शेख बशिर शेख तुरब (Sheikh Bashir Sheikh turab) पाटबंधारे विभागात कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत . 

शेख बशीर शेख तुरब 22 जूलै 2022 रोजी रात्री आठ वाजता दरम्यान आपल्या घरी जेवण करत असताना त्यांना ठसका लागला. त्यामुळे पत्नी मुस्कान बी शेख बशीर (वय 38) (Muskan B. Sheikh Bashir) रा,जवळा हिने पती शेख बशिर यांना जाऊन पाहिले असता शेख बशिर यांच्या घशात कोंबडीचे उकळलेले अंडे अडकलेले दिसले. पत्नीने घशात आडकलेले अंडे काढण्याचा प्रयत्न केला. अंडयाचा काही भाग निघाला आणि काही अडकून राहिला. त्यामुळे शेख बशिर यांना श्वास घेण्यात त्रास होउ लागला . 

शेख बशिर यांना ता,22 जूलै रोजी राञी नऊ वाजता दरम्यान उपचारासाठी आर्णी ग्रामीण रुग्णालयात भरती केले. डाँक्टरांनी शेख बशिर शेख तुरब त्यांना मृतक घोषीत केले. दरम्यान, वैद्यकीय अहवाल (medical report) आल्यावरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल. 

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!