Home सिरोंचा अकोल्यातून गडचिरोली जिल्ह्यात नकली नोटा पोहचविण्याचा प्रयत्न

अकोल्यातून गडचिरोली जिल्ह्यात नकली नोटा पोहचविण्याचा प्रयत्न

सिरोंचा : झटपट पैसे कमावण्याच्या नादात नकली नोटा चलनात आणण्यासाठी अकोला येथून घेऊन येणाऱ्या तीन आरोपींना तेलंगणातील महादेवपूर पोलिसांनी शनिवारी रंगेहाथ पकडले.

यातील दोघे तेलंगणातील, तर एक आरोपी सिरोंचा येथील आहे. या नकली नोटा गडचिरोली जिल्ह्यात चलनात आणण्याचा त्यांचा डाव होता.
प्राप्त माहितीनुसार, सिरोंचा तालुक्यालगत असलेल्या तेलंगणाच्या जयशंकर भूपालपल्ली जिल्ह्यातील बेगलूर गावात राहणाऱ्या सतीश सम्मय्या पोलू या शेती व्यवसाय करणाऱ्या युवकाला झटपट पैसे कमवायचे होते. महाराष्ट्रातील अकोला येथे एका व्यक्तीकडून नकली नोटा मिळतात अशी माहिती त्याला मिळाली होती. त्या नोटा आणून सिरोंचा तालुक्यातील ग्रामीण भागात त्या चलनात आणल्या जाऊ शकतात, असा त्याला विश्वास होता. त्यासाठी सतीश याने त्याच्याच गावातील सुरेश मल्ल्या एलुकुची याला सोबत घेऊन सिरोंचा येथील जयंत मांडवे याच्याशी संपर्क केला. मांडवे यालाही ही कल्पना आवडली.
ठरल्यानुसार हे तिघेही ५० हजार रुपयांची कॅश घेऊन सतीशच्या कारने (क्र. एपी २८ डीएस ०००८) अकोल्याला गेले. तिथे संबंधित अज्ञात व्यक्तीशी त्यांचा संपर्कही झाला आणि त्या ५० हजार रुपयांच्या असली नोटांच्या बदल्यात त्या व्यक्तीने या तिघांना ३ लाखांच्या नकली नोटा दिल्या. पोलिसांनी जप्त केलेल्या नकली नोटांमध्ये १०० रुपयांच्या ९९५ नोटा आणि २०० रुपयांच्या ९९४ नोटा होत्या. नकली नोटांचा पुरवठा करणारी अकोल्यातील ती व्यक्ती कोण, याचाही शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले आहे.

१७०० च्या नकली नोटा मार्गातच चालविल्या
अकोला येथून ३ लाख रुपयांच्या नकली नोटा घेतल्यानंतर तीनही आरोपी सिरोंचाच्या दिशेने निघाले. मार्गात त्यांनी त्या नकली नोटांमधूनच १७०० रुपये वापरून व्यवहारही केले. त्या नोटा सहजपणे चालल्याचे पाहून त्यांना नोटा कोणाला ओळखू येणार नाही, याबद्दल विश्वास निर्माण झाला.

अन् नकली नोटांचे बिंग फुटले
३ लाखांपैकी १७०० रुपये खर्च झाल्यानंतर उर्वरित २ लाख ९८ हजार ३०० रुपयांच्या नकली नोटा घेऊन आरोपी तेलंगणातील आपल्या गावी बेगलूर येथे येणार होते. दोन दिवस गावात आराम केल्यानंतर या नोटा हळूहळू सिरोंचा तालुक्यात नेऊन चलनात आणू असा त्यांचा डाव होता; पण बेगलूर येथे पोहोचण्याआधीच कुडूरुपल्ली क्रॉस रोडवर महादेवपूर पोलिसांनी त्यांच्या वाहनांची तपासणी केली असता नोटांच्या बंडलचे कव्हर पोलिसांना दिसते. त्यामुळे सखोल तपासणीत ते पैसे नकली असल्याचे आढळले.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
मुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556
RELATED ARTICLES

अतिदुर्ग भागातील पूरग्रस्तांना आ. वडेट्टीवारांनी दिला मदतीचा हात.. सिरोंचा तालुक्यातील ५४ गावे व हजारों हेक्टर जमीन पाण्याखाली

सिरोंचा : यंदाचे वर्षी जुलै महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला. तसेच धरणांमध्ये जलसाठ्यातही प्रचंड वाढ झाली. यामुळे राज्य सीमेवर वसलेल्या सिरोंचा...

आसरअली महामार्गावर अचानक दुचाकी वाहनाला लागली आग.

सिरोंचा :- तालुक्यातील आसरअल्ली मार्गावर पोचमपल्ली, नडीकुडा गावाजवळ दुचाकी ला अचानक आग लागल्याने जळून खाक झाली. रंगधामपेटा येथील पवन किंगिनी भोईना आपली दुचाकी ने सिरोंचा ते...

आदिवासी विद्यार्थी संघाच्या वतीने दिलेल्या निवेदनाची प्रशासनाने घेतली दखल…

सिरोंचा:- आल्लापल्ली व आसरअल्ली या दोन्ही राष्ट्रीय महामार्गांवरील मोठ-मोठे खड्डे तात्काळ न बुजविल्यास आदिवासी विद्यार्थी संघ सिरोंचा शाखेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी आ. तथा...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आमदार श्री. विजय वडेट्टीवार यांचा दि. ८ ऑगस्ट २०२२ रोजीचा दौरा कार्यक्रम….

सोमवार दि. ८ ऑगस्ट २०२२ सकाळी ८.०० वाजता -: नागपूर येथून चंद्रपूर कडे प्रयाण सकाळी १०.०० वाजता -: शासकीय विश्रामगृह (सर्किट हाऊस),चंद्रपूर येथे आगमन व राखीव सकाळी ११.०० वाजता -:...

वंचित बहुजन आघाडीच्या माजी तालुकाध्यक्षांसह विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काॅंग्रेस पक्षात प्रवेश

ब्रम्हपुरी :- केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सध्या देशातील सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे काॅंग्रेस पक्षच या देशाला विकासाकडे नेऊ शकतो ही भावना नागरिकांमध्ये...

रस्ता दुरुस्त केल्याशिवाय धानाची उचल करू देणार नाही वॉर्ड नंबर तीन मधील महिलांचा आक्रोश

ब्युरोचीफ प्रशांत शाहा गडचिरोली:- चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथील नवीन महामंळाचे गोडाऊन मधून मागील वर्षी खरेदी केलेल्या धानाची उचल केल्या जात आहे. गोडाऊन कडे जाणार मार्ग...

राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आमदार श्री. विजय वडेट्टीवार यांचा दि. ६ ऑगस्ट २०२२ रोजीचा दौरा कार्यक्रम….

शनिवार दि. ६ ऑगस्ट २०२२ सकाळी ७.०० वाजता -: नागपूर येथून गडचिरोली कडे प्रयाण सकाळी ९.३० वाजता -: "रानफुल' निवासस्थान पोटेगाव रोड गडचिरोली येथे आगमन व राखीव सकाळी १०.३० वाजता -:...

Recent Comments

Don`t copy text!