Homeशैक्षणिकखुशखबर: बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर...

खुशखबर: बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर…

मुंबई, 07 जून: यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या. आता या परीक्षांचा निकाल लागणार आहे. आताच समोर आलेल्या माहितीनुसार, उद्या 12 वीचा निकाल लागणार आहे. उद्या म्हणजे 08 जून रोजी राज्यातील 12 वीचा निकाल लागेल.

राज्यातील सर्व विभागांचे दहावी आणि बारावी बोर्डाचे निकाल हे येत्या काही दिवसातच जाहीर होतील अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. त्यानुसार उद्या म्हणजेच 08 जूनला बारावीचा निकाल लागणार आहे.

किती वाजता जाहीर होणार निकाल

दरवर्षी प्रमाणे यंदाही बारावी बोर्डाचा निकाल हे सुमारे दुपारी एक वाजताच्या दरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे. हे सर्व निकाल ऑनलाईन पद्धतीनं पोर्टलवर जाहीर होणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि त्यांच्या आईचं नाव देऊन आपला निकाल बघता येईल अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

निकालाचं प्रिंट घ्या

निकाल हा ऑनलाईन पद्धतीनं जरी इंटरनेटवर दिसत असला तरीही क्रॉस चेक केल्यानंतर निकालाच्या दोन ते तीन प्रिंट्स घेऊन ठेवणं आवश्यक आहे. कॉलेजमधून निकालाची ओरिजनल प्रिंट मिळण्यासाठी अनेक दिवस लागतात. मात्र तेवढ्यात 13 वी आणि इतर प्रवेश सुरु होत आहेत. म्हणूनच निकालाची प्रिंट घेऊन ठेवणं आवश्यक आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!