HomeBreaking Newsटायगर ग्रुप च्या सदस्यांनी बुजवले खड्डे..! महाराष्ट्र सरकार आणि त्रिवेणी कंपनीच्या निषेधार्थ...

टायगर ग्रुप च्या सदस्यांनी बुजवले खड्डे..! महाराष्ट्र सरकार आणि त्रिवेणी कंपनीच्या निषेधार्थ टायगर ग्रुपचे सदस्य रस्त्यावर

आल्लापल्ली : सुरजागड लोह खनिज प्रकल्पातील ओव्हरलोड ट्रकान मूळे रस्त्यावर मोठ-मोठ्या खड्डे झाले आहे त्या खड्ड्यानं मुळे रोज अनेक अपघात होत आहेत आणि अपघातांची संख्या वाढत जात आहे जर या सर्व गोष्टींवर दुर्लक्ष करत असल्यास खूप मोठी दुर्घटना घडणार आणि याची जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न पडत आहे ?


गेल्या ४-६ महीण्यांपासुन सुरजागडचा लोहखणिज जलदगतीने पळवुन नेण्याचा त्रिवेणी कंपनीने घाटच घातला आहे. त्यासाठी वाहनांच्या मर्यादेपेक्षा जास्त कच्चा माल लादल्या जात आहे. त्यातल्या त्यात लवकरात लवकर जास्तीत जास्त माल लंपास करता यावा यासाठी वाहनांना वेगात माल नेण्याच्या अप्रत्यक्षरित्या सुचना दिल्या गेल्या आहेत. त्यामुळे वाहनांचा तोल सुटणे रोजचाच भाग झाला आहे. आता हळुहळु अपघातांची तिव्रता सुध्दा वाढतच आहे. येणारा काळ अजुन किती भयंकर अपघात दाखविणार हे सांगता येत नाही. वेगाने माल पळवून नेण्याच्या स्पर्धेत शहीद अजय मास्टे चौकात त्रिवेणीच्याच दोन वाहनांची धडक झाली.
जर सुरजागड लोहखनिज प्रकल्प जर असच चालू राहणार तर समोर असच दुर्घटना घडत राहणार
यामुळे इथे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सामान्य माणसाची बाजू कंपनी किंवा सरकार कोणीही घेत नसल्याने टायगर ग्रुप यात दखल घेतली ..!

‌ महाराष्ट्र सरकार आणि त्रिवेणी कंपनीच्या निषेधार्थ टायगर ग्रुपचे सदस्य रस्त्यावर उतरून गावाची जबाबदारी स्वतः घेऊन रस्त्यावरील खड्डे बुजवले व या नंतर कोणत्याही अपघात झाल्यास शासन जबाबदर राहील असे बोले.!

उपस्थित टायगर ग्रुप संचालक साई तुलसीगारी ,टायगर ग्रुप अध्यक्ष दौलत रामटेके, सचिव आदर्श केशनवार , गौरक्षण प्रमुक कुणाल वर्धलवार, दीपक तोगरवार , मोहनिष पेंदोर ,नमन नागपूरवार, अमोल सामीलवार,प्रकाश सिंगनेर, सचिन धानोरकर ,अमन अलगमकर ,चिक्कू गजलवार,अशोक मधेरलावार,विषवनाथ कोवे,शुभम मधेरलावार,मयूर मेकलवार व आलापल्ली गावकरी व व्यापारी बांधव उपस्थित होते..!

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!