Home Breaking News तेलंगाना राज्यातील ताडपल्ली ( कूलथा)श्री शिव सिद्धी हनुमान मंदिर यात्रा महोत्सवाला सुरुवात…...

तेलंगाना राज्यातील ताडपल्ली ( कूलथा)श्री शिव सिद्धी हनुमान मंदिर यात्रा महोत्सवाला सुरुवात… लोकप्रिय आमदार मा. सुभाषभाऊ धोटे यांचे हस्ते मूर्ती पूजन व यात्रा महोत्सव घटस्थापना संपन्न…

546

शरद कुकूडकार भंगाराम तळोधी प्रतिनिधी

गोंडपिपरी : गोंडपिपरी तालुक्यातील दरुर गावाच्या समोरील वर्धा नदीच्या तीरावर असलेले श्री शिव सिद्धी हनुमान मंदिर यात्रा महोत्सवाची घटस्थापना कार्यक्रम आज दी.२८ /२/२०२२ रोजी लोकप्रिय आमदार मा. सुभाषभाऊ धोटे यांचे शुभ हस्ते संपन्न झाला.

तालुक्यातील महाराष्ट्र व तेलंगणा सीमेच्या मधोमध वाहणाऱ्या वर्धा नदी लगत असलेले तेलंगणा राज्यातील ताडपल्ली (कुलथा) येथील श्री शिव सिद्धी हनुमान मंदिर हे लगतच्या परिसरातील भाविकांसाठी प्रसिद्ध मंदिर आहे. येथे दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त ४ ते ५ दिवसाची यात्रा भरते.
दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा भव्य यात्रा महोत्सवाच्या घटस्थापनेचा कार्यक्रम पार पडला. या मंदिरातील देवस्थान कमिटीने राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा. सुभाषभाऊ धोटे यांचे हस्ते उद्घाटन घटस्थापना करण्याचे आयोजिले होते. पाचारनार्थ आमदार साहेबांनी आज ताडपल्ली कूल्था येथील श्री. शिव सिद्धी हनुमान मंदिराला भेट दिली.समस्त देवस्थान कमिटीच्या वतीने आमदार साहेबांचे स्वागत करण्यात आले.साहेबांनी घटस्थापनेला उपस्थित देवस्थान कमिटी पदाधिकाऱ्यांना व यात्रेला दर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तांना विशेष मार्गदर्शन केले. आमदार मा. सुभाषभाऊ धोटे यांनी मंदिरात मूर्ती पूजा करून साहेबांच्या शुभ हस्ते यात्रा महोत्सवाचे उद्घाटन व घटस्थापना करून यात्रेचा शुभारंभ झाला.

घटस्थापना प्रसंगी पोडसाचे सरपंच देविदास सातपुते, गोंडपिपरी युवक काँग्रेसचे अध्यक्ष संतोष बंडावार, संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष विनोद नागापुरे, दरूरचे उपसरपंच बालाजी चनकापुरे, सिनु कंदनुरीवार,संजय झाडे, देवस्थान कमिटीचे मुख्य पदाधिकारी, कार्यकर्ते, व भाविक भक्तांची उपस्थिती होती.

Don`t copy text!