HomeBreaking Newsगोंडपिपरी नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या सवीता कुळमेथे तर उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या सारीका मडावी

गोंडपिपरी नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या सवीता कुळमेथे तर उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या सारीका मडावी

गोंडपिपरी (सुनील डी डोंगरे)

गोंडपिपरी नगर पंचायतच्या नगराध्यक्षपदि अपेक्षेप्रमाणे काँग्रेसच्या सौ सविता कुळमेथे यांची ११ विरुद्ध ६ अशी निवड झाली तर शिवसेनेच्या सारिका मडावी यांची उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाली.

ठरल्याप्रमाने दिनांक १७फेब्रुवारी रोजी नगराध्यक्ष ,उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीची बैठक संपन्न झाली .
उपविभागीय अधिकारी अध्याशी अधिकारी म्हणून हजर होते. काँग्रेसतर्फे सौ सविता बबलू कुळमेथे तर भाजपकडून कु मनीषा मडावी या नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात उभ्या होत्या.सौ सवीता कुळमेथे यांना ११तर मनीषा यांना ६मते पडली.अशा मताधिक्याने सौ सविता कुळमेथे नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या.
काँग्रेसचे ७,शिवसेनेचे २,आणी अपक्ष २असे एकूण ११नगरसेवक काँग्रेसकडे आहेत.तर भाजपचे ४,राष्ट्रवादीचे २असे ६नगरसेवक विरोधी बाकावर आहेत.
उपनगराध्यक्षपदि शिवसेनेच्या सौ सारीका मडावी या बिनविरोध निवडल्या गेल्या.भाजप + राष्ट्रवादी गटाने नगराध्यक्ष पदासाठी ‘गणित’ मांडून हालचाल चालवली होती तथापी त्यांना यश आले नाही..!
काँग्रेस +शिवसेनेची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी आमदार सुभाषभाऊ धोटे,शिवसेनेचे संदीप करपे,खेमचंद गरपल्लीवार यांचे विशेष मार्गदर्शन आणी सहकार्य राहिले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!