HomeBreaking Newsयीन वनमंत्री तथा गडचिरोली यीन पालकमंत्री सुरज चौधरी यांनी दिली वनमजूर ,वनरक्षक...

यीन वनमंत्री तथा गडचिरोली यीन पालकमंत्री सुरज चौधरी यांनी दिली वनमजूर ,वनरक्षक साहेब व कामगारांना भेट

– गौरव लुटे आरमोरी तालुका प्रतिनिधी

वडसा – महाराष्ट्र राज्यात संत तुकाराम वन योजने अंतर्गत २००८- ०९ मध्ये तृतीय आणि २००९-१० मध्ये द्वितीय व २०११ – १२ मध्ये प्रथम पारितोषिकाचे मानकरी ठरलेल्या वडसा तालुक्यातील कोंढाळा गावाला भेट देऊन वन संरक्षण व वन संवर्धनाची स्थानीकांसोबत सुरज चौधरी यांनी शपथ घेतली. वनखात्याकडून सामान्य नागरीकांचे तसेच स्थानीक पातळीवरील लोकांच्या अपेक्षा व त्यांचे प्रश्न आणि समस्या जानून घेतले.वनखात्याचा अभ्यास करून मुंबई येथे होणाऱ्या यीन अधिवेशनात वनमंत्री म्हणून ठराव मांडणार असल्याचे यीन वनमंत्री तथा गडचिरोली तीन पालकमंत्री सुरज चौधरी यांनी आश्र्वासन दिले.

जल,जंगल, जमीन यांचे महत्त्व पटवून देत यावर मार्गदर्शन करण्यात आले.काल देसाईगंज व क्षेत्रातील स्थानीक कामगारांशी प्रत्यक्ष चर्चा करण्यात आली.त्याचे प्रश्न समजून घेत ठरावात विशीष्ट पद्धतीने ते मांडण्याचा प्रयत्न केला जाईल.माणूस म्हणूण जगतांना निसर्गाचा किती मोठा आणि महत्वाचा स्थान आहे हे स्थानिकांना पटवून देण्यात आले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!