वरोरा येथील ट्रॅव्हल्स व ट्रकचा भीषण अपघात.. अपघातग्रस्तांवर तातडीने वैद्यकीय उपचार करण्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे निर्देश.

360

चंद्रपूर – आज वरोरा येथे झालेल्या भीषण अपघाताबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर बहुजन कल्याण विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांना नागपुर येथील बैठकीत माहिती मिळताच त्यांनी तातडीने बैठक आटोपती घेतली. लगेच जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक यांना फोन करून, अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देश दिले. अपघातग्रस्तांसाठी त्वरीत रुग्णवाहिका पाठवून वरोरा ग्रामीण रुग्णालय, चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालय येथे क्षणाचाही विलंब न करता उपचार करावे. अपघातानंतरचा एक तास अतिशय महत्वाचा असतो. जास्तीत जास्त रुग्णांना वाचविण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, असेही त्यांनी म्हटले. सर्व परिस्थितीवर पालकमंत्री लक्ष ठेवून आहेत.