नोकरी: आदिम जमातीतील (कोलाम) युवक-युवतींकडून प्रकल्प समन्वयक पदाकरिता अर्ज आमंत्रित

0
48

चंद्रपूर दि. 11 जानेवारी : आदिम जमाती संरक्षण तथा विकास कार्यक्रमातर्गत आदिम जमाती कक्षाशी निगडित कार्य तात्काळ सुरू करणे व सुलभ करण्याकरीता प्रकल्प समन्वयकाची नियुक्ती करणे अभिप्रेत आहे. आदिम जमातीतील (कोलाम) युवक-युवतींची प्रकल्प समन्वयक पदांसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपुर या कार्यालयाकडून निवडलेल्या उमेदवारांची युनीसेक मॅनेजमेंट सर्विस प्रायव्हेट लिमिटेड या बाह्यस्रोत यंत्रणेकडे शिफारस करावयाची असल्याने पात्रता धारण करीत असलेल्या आदिम जमातीतील (कोलाम) युवक-युवतीकडून प्रकल्प समन्वयक या पदाकरीता अर्ज मागविण्यात येत आहे.

या पदासाठी उमेदवाराची सर्वसाधारण पात्रता, उमेदवार आदिम जमातीचा (कोलाम), चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असावा किंवा असावी. त्याचे किमान पदवीपर्यंतचे शिक्षण झालेले असावे, कमाल पदव्युत्तर पदवी असणे योग्य राहील. एम.एस.डब्ल्यू, बी.एस.डब्ल्यू, सामाजिक शास्त्र व तत्सम सामाजिक कार्यक्रम अभ्यासक्रमास प्राधान्य राहील. उमेदवारास वंचित समाजाच्या विकासासाठी कार्यक्रम केल्याचा 1 ते 2 वर्षाचा अनुभव असावा.

तरी, उपरोक्त पात्रता धारण करीत असलेल्या इच्छुक आदिम जमाती (कोलाम) युवक-युवतींनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय,चंद्रपूर कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे, प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here