HomeBreaking Newsयेनबोडी येथे प्रशांत भंडारे यांच्या ‘कवडसा’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन.. झाडीबोली जिल्हा साहित्य...

येनबोडी येथे प्रशांत भंडारे यांच्या ‘कवडसा’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन.. झाडीबोली जिल्हा साहित्य मंडळ कार्यक्रम.

नागेश इटेकर,गोंडपिपरी (सहसंपादक)

चंद्रपूर : झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर(ग्रामीण),शाखा बल्लारापूर च्यावतीने कर्मविर विद्यालय येनबोडी येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला.याप्रसंगी कवी प्रशांत भंडारे यांच्या ‘कवडसा’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक,कवी डाॕ.धनराज खानोरकर होते तर उद्घाटक म्हणून अॕड.पारोमिता गोस्वामी विचारवंत तथा सामाजिक कार्यकर्त्या तर प्रमुख अतिथी म्हणून अरुण झगडकर,अध्यक्ष झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर, विजय वासाडे सचिव कृषी जीवन विकास प्रतिष्ठान.डॉ.राज मुसने, ज्येष्ठ विचारवंत चंद्रपूर विजय सिद्धवार श्रमिक एल्गार संस्थापक, डॉ.प्रभाताई वासाडे साहित्यिक चंद्रपूर तर भाष्यकार म्हणून राजुरा येथील गझलकार दिलीप पाटील तसेच मुल येथील मोरगडकार कवी लक्ष्मण खोब्रागडे लाभले होते.यावेळी पाहुण्यांची भाषणे झालीत. अध्यक्षीय भाषणात कवी डॉ खानोरकर म्हणाले की, कोणतीही बोली ही त्या मातीच्या माणसाचे अनुभव समृध्द करते. बोलीतील कविता त्या अनुभूतीचे स्पंदन असतात.आता झाडीबोलीला चांगले दिवस आले असून अनेक मान्यवर आपले अनुभव बोलीतून मांडत आहेत.समीक्षकांनाही दखल घेण्याची अकल येत आहे.असे विचार मांडले.

बल्लारपूर तालुकाध्यक्ष कवी प्रशांत भंडारे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. याप्रसंगी झाडीबोली जिल्हा शाखेच्या वतीने प्रशांत भंडारे यांचा सन्मानचिन्ह देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.

दुसऱ्या भागात कवी अरूण झगडकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रा.विनायक धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या कविसंमेलनात संजिव बोरकर, उपेंद्र रोहनकर,शितल कर्णेवार,संतोष मेश्राम,नेताजी सोयाम,मंदाकिनी चरडे, प्रदीप मडावी, सुनील पोटे, मनिषा मडावी, वृंदा पगडपल्लीवार, दिलीप पाटील, परमानंद जेंगठे, नंदकिशोर मसराम, जयंती वनकर, सुजीत मांदाडे,किरण लोडे,वंदना हटवार,संगिता बांबोळे,सुधाकर कन्नाके,अनिल आंबटकर, योगिराज उमरे आदींनी कविता सादर केल्यात. शासनाच्या निर्देशानुसार कोरोना नियमांचे पालन करुन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. सूत्रसंचालन डाॕ.अर्चना जुनघरे आणि विरेनकुमार खोब्रागडे यांनी केले तर आभार प्रदर्शन दुशांत निमकरा यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी झाडीबोली साहित्यातील यांच्यासह अनेक मान्यवरांनी सहकार्य केले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!