घोट नजीकच्या चापलवाडा येथे चार चाकी वाहन व दुचाकीच्या अपघातात एक इसम गंभीर जखमी

0
551

ब्युरोचीफ प्रशांत शाहा

चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील घोट येथून जवळच असलेल्या चापलवाडा येथे दुपारी बारा वाजताच्या सुमारास एक चारचाकी वाहन क्रमांक(MH35 P 1907) व दुचाकी क्रमांक(MH33 AA 5042)चा अपघात झाला असून या अपघातात पलसपूर येथील सुखरंजन मंडल वय वर्ष 34 हे गंभीर जखमी झाले
घटनेची माहिती चापलवाडा येथील समाजसेवक श्री गीतेश कोहपरे यांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनेची माहिती घोट पोलिसांना देत आपल्या चारचाकी वाहनाने जखमिस चामोर्शी येथिल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले
पुढील तपास घोट पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here