सामान्य लोकांना महागाईची भेट हेच मोदी सरकारचे अच्छे दिन – मा. ना. विजयभाऊ वडेट्टीवार… एकारा (ब्रह्मपुरी) येथे गॅस, पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किमती विरोधात काँग्रेसचा जनजागरण मेळावा

0
89

चंद्रपूर – गेल्या सात वर्षापासून मोदी सरकारच्या काळात सामान्य लोकांचे जगणे कठीण झाले आहे. केवळ चार-पाच उद्योगपतीसाठी हे सरकार काम करत आहे. सामान्य लोकांच्या मुख्य गरजा असलेल्या जीवनावश्यक वस्तुंचे भाव मोदी सरकारने वाढवले आहे. गॅस सिलिंडर, पेट्रोल, डीजल, खाद्यतेल, खत, बी-बियाने सर्वांच्या किमती गगनाला भिडल्या आहे. सामान्य लोकांना महगाइची भेट, हेच मोदी सरकारचे अच्छे दिन आहे, असा घनाघात मा. ना. विजयभाऊ वड़ेत्तिवार यांनी केला.

ब्रम्हपुरी तालुक्यातील एकरा येथे मोदी सरकारच्या महागाई विरोधात काँग्रेसचा जनजागरण मेळावा घेण्यात आला. मा. ना. विजयभाऊ वड़ेत्तिवार यांनी बैलबंडी वरून महागाई विरोधात मोर्चा काढला, त्यावेळी ते बोलत होते.
पुढे विजयभाऊ म्हणाले, गावागावात गेल्याशिवाय समस्या कळत नाही, मोदी सरकारच्या धोरणाविरोधात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने जनजागरण मेळावे घेण्याचे आदेश दिले. जनजागरणातून मोदी सरकार विरुद्ध काँग्रेसने एल्गार पुकारला आहे. काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. स्वातंत्र्याच्या वेळी आत्ताचे सत्ताधारी लोक इंग्रजांचे तळवे चाटत होते. हेच ढोंगी बगळे आता देशभक्तीची भाषा करतात. गुण्यागोविंदाने राहणाऱ्या समाजाला भाजपाचे लोक भडकवत आहेत. आपला देश धर्मनिरपेक्ष या तत्वावर चालतो. जात, धर्म, पंथ या बाबी नंतर पहिले देश. मात्र, काहीही काम करायचे नाही पण धार्मिक तेढ निर्माण करून समाजात दुही निर्माण करण्याचे काम भाजपा करीत आहे. इंदिराजींनी पाकिस्तानचे तुकडे करून नकाशा बदलविला. डॉ. बाबासाहेबांनी देशाची राज्यघटना लिहिली. त्या संविधानावर देश चालत आहे. नेहरूजी, इंदिराजी व राजीवजी या नेत्यांनी सरकारी कंपन्या उभ्या केल्या. देश एकसंघ बांधला. मात्र आज खाजगीकरणाच्या नावाखाली मोदी सरकारने देश विकायला काढला आहे. केंद्र सरकार हे सामान्यांचे सरकार नसून केवळ उद्योगपतींचे सरकार आहे. काँग्रेसच्या काळात पेट्रोल-डिझेल फक्त 60 ते 70 रुपये मिळत होते, आज तेच पेट्रोल आणि डिझेल 110 रुपयापर्यंत गेले आहे. काँग्रेसच्या काळात तीनशे पन्नास रुपयाला मिळणारा गॅस सिलेंडर आज 1000 पार झाला आहे. खाद्यतेल, डाळी, खते, कीटकनाशके, बी-बियाणे सर्वांच्या भरमसाठ किमती वाढवून मोदी सरकारने सामान्यांचे जगणे मुश्किल केले आहे. काँग्रेसच्या काळात पेट्रोल-डिझेल वर 2 रूपये वाढविले तर भाजपाचे लोक नौटंकी करत मोर्चे काढत होते. आज कुठे आहे हे नौटंकी बाज लोक. म्हणून या केंद्र सरकारला उखडून फेकण्याची वेळ आता आली आहे. काँग्रेसच्या मागे सर्वांनी एकजुटीने उभे राहावे. राज्यातील महा विकास आघाडी सरकार भक्कम आहे. भाजपावाले फक्त मुहूर्त देत आहे. पाच वर्षे आणि पुढेही आमचेच सरकार येणार आहे, असे मा. ना. विजयभाऊ वड़ेत्तिवार म्हणाले.

या जनजागरण मेळावा कार्यक्रमाप्रसंगी ब्रह्मपुरी काँग्रेस तालुका अध्यक्ष खेमराज तिडके, तालुका काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रभाकर सेलोरकर, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चीमुरकर, जिल्हा परिषद सदस्य डॉ राजेश कांबळे, पंचायत समिती सदस्य थानेश्वर कायरकर, तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष मंगला लोनबळे, युवक काँग्रेस अध्यक्ष सोनू नाकतोडे, प्रमोद मोटघरे, सावली महिला काँग्रेस अध्यक्ष उषाताई भोयर,दिवाकर मातेरे, अमित कांनाके, मुन्ना रामटेके, अनिकेत उरदर एकारा येथील सरपंच हरीचंद्र गेडाम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here