HomeBreaking Newsआधारभूत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 35 धान केंद्रांना खरेदीची मंजुरी... धान खरेदीला 31...

आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 35 धान केंद्रांना खरेदीची मंजुरी… धान खरेदीला 31 जानेवारी 2022 पर्यंत मान्यता

चंद्रपूर दि. 25 नोव्हेंबर: खरीप पणन हंगाम 2021-22 मधील शासकीय आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील एकूण 35 धान खरेदी केंद्रांना धान खरेदी सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी मंजुरी प्रदान केली आहे. शासन निर्णयानुसार धान खरेदीचा कालावधी दि.1 ऑक्टोबर 2021 ते 31 जानेवारी 2022 पर्यंत निश्चित करण्यात आला आहे.

शासन निर्णयातील नमूद सुचनेनुसार, प्रत्येक गाव एका विशिष्ट खरेदी केंद्रास जोडण्यात आला होता. खरेदी केंद्राशी जोडलेल्या गावातील शेतकऱ्यांना त्याच खरेदी केंद्रावर आपला धान विकणे अनिवार्य होते. तो इतर केंद्रावर धान विक्री करू शकत नव्हता. परंतु शेतकरी हिताच्या दृष्टीने यात सुधारणा करून तालुका हद्दीमध्ये कोणत्याही गावातील शेतकरी शेतकरी त्याच्या इच्छेनुसार तालुक्यातील कोणत्याही खरेदी केंद्रावर धान विक्री करू शकतो.

तरी, ऑनलाईन नोंदणीकृत शेतकऱ्यांनी तालुक्यातील कोणत्याही खरेदी केंद्रावर जाऊन धानाची विक्री करावी. तसेच ऑनलाईन नोंदणी करतेवेळी शेतकऱ्यांनी आधार कार्ड, वोटिंग कार्ड, शेतीचा सातबारा, बँक खाते पासबुक इत्यादी कागदपत्रासह खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करावी व धानाची नियोजित वेळेत विक्री करावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी अनिल गोगीरवार यांनी केले आहे.

तालुकानिहाय खरेदी केंद्रांची यादी:

सावली तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. सावली व व्याहाळ (खुर्द), किसान सहकारी तांदुळ गिरणी व्याहाळ (बुज), सेवा सहकारी संस्था मर्या,पाथरी. सिंदेवाही तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. नवरगाव, नवरगाव सह. राईस मिल, नवरगाव, सेवा सहकारी संस्था मर्या. रत्नापूर, सिंदेवाही सह.भात गिरणी संस्था मर्या. सिंदेवाही. नागभीड तालुक्यातील सह.खरेदी विक्री संस्था मर्या. नागभीड, सेवा सहकारी संस्था मर्यादित तळोधी (बा.), श्री. गुरुदेव सहकारी राईस मिल, कोर्धा. मूल तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती, मुल व राजोली वि. का.सह. संस्था मर्या. राजोली. चिमूर तालुक्यातील चंद्रपूर जिल्हा कृषी औ. संघ मर्या. चिमूर, व चिमूर ता. सह.शेतकी ख.वि. संस्था नेरी. बल्लारपूर तालुक्यातील कोरपणा ता.ख.वि. समिती कोरपणा, कोठारी.

गोंडपिपरी तालुक्यातील कोरपणा ता.ख.वि. समिती कोरपणा,ता.गोंडपिपरी. पोंभूर्णा तालुक्यातील कोरपणा ता.ख.वि. समिती कोरपणा, बोर्डा व कृषी उत्पन्न बाजार समिती, पोंभूर्णा. ब्रम्हपुरी तालुक्यातील सेवा सहकारी संस्था पिंपळगाव, आवळगाव, चौगान, अऱ्हेर नवरगाव, चंद्रपूर जिल्हा कृषी औ. संघ, ब्रह्मपुरी, सहकारी खरेदी विक्री संस्था ब्रह्मपुरी, चंद्रपूर जिल्हा कृषी औ. संघ, ब्रह्मपुरी बरडकिन्ही, सेवा सहकारी संस्था मराळमेंढा, उदापूर, तोरगाव (खुर्द) या खरेदी केंद्रावर जाऊन धान खरेदी करावी, असे कळविण्यात आले आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!