HomeBreaking Newsमहागाई च्या विरोधात जनजागरण करण्यासाठी महिला काँग्रेस राबवणार 'रसोई की बात' हे...

महागाई च्या विरोधात जनजागरण करण्यासाठी महिला काँग्रेस राबवणार ‘रसोई की बात’ हे अभियान.. १५ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर पर्यंत महिलांच्या स्वयंपाक घरात भेट देऊन महागाई वर करणार थेट चर्चा.

सामाजिक : अखिल भारतीय काँग्रेस कमेटी च्या सूचनेनुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस च्या महागाई विरोधातील जनजागरण मोहिमेचा भाग बनण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्या निर्देशानुसार   गृहिणींशी ‘रसोई की बात’ हे अभियान १५ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर या काळात राबवण्यात येणार असून याची सुरवात शहरातील रहेमत नगर या परिसरातून आज करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर यांच्या नेतृवात हे अभियान राबवण्यात येणार आहे.

मागच्या सात वर्षांमध्ये केंद्रातील भाजप सरकारमुळे कृत्रिम महागाई निर्माण झाली आहे. सिलिंडर चे दर १००० च्या आसपास झाले आहे तर पेट्रोल डिझेल लवकरच १५० चा पल्ला गाठेल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे सर्व जीवनावश्यक वस्तू देखील कमालीच्या महाग झाल्या आहेत, याची सर्वात जास्ती झळ ती घरातील गृहिणींना बसत आहे.

त्यांना आपल्या घरातली बजेट सांभाळणे कठीण होत आहे म्हणून अशा महिलांशी थेट महागाई वर संवाद करून कृत्रिम महागाई देशावर लादणाऱ्या केंद्र सरकारचा पर्दा फाश करून जनजागरण करण्यासाठी ‘रसोई की बात’ हे अभियान राबवण्यात येणार आहे अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर यांनी दिली आहे.

भारताचे प्रथम पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त त्याच सोबत देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त १४ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत महागाई विरोधात काँग्रेस कडून संपूर्ण देशात जनजागरण अभियान राबवण्यात येणार आहे.

या अभियानात अनुसूचित विभाग, सेवादल महिला काँग्रेस, सेवा फाऊंडेशन काँग्रेस च्या पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. यावेळी महिला काँग्रेस च्या पदाधिकारी मुन्नी मुमताज शेख, सेवा फाऊंडेशन काँग्रेस च्या शहर अध्यक्ष शीतल कातकर, महिला सेवादल च्या जिल्हाध्यक्षा स्वाती त्रिवेदी, शहर अध्यक्ष लता बारापात्रे, उपाध्यक्षा परवीन सय्यद,अनुसूचित विभागाच्या महिला जिल्हाध्यक्षा अनु दहेगवाकर, सुष्मा बनसोड, संगीता मित्तल, नेहा मेश्राम, मंगला शिवरकर, मीनाक्षी गुजरकर, समिस्ता फारुकी, किरण वानखेडे, अहेमदी कुरेशी, मुमताज शकील, नजमा वहाब, गुलशन अन्सारी, नसरीन नईम, शाहीन खान, अरशिया खान, आरेफा खान, आस्मा देशमुख, मुमताज शेख, समरीन देशमुख, आसिया जब्बार यांची उपस्थिती होती.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!