पुनर्वसन स्थळ सिनाळा ते जुना सिनाळा येथील विद्यार्थ्यांसाठी बस सुरू… महिला व बालकल्याण सभापती रोशनी ताई खान यांचा पुढाकार..

0
109

चंद्रपुर: माननीय रोशनी ताई खान महिला व बाल कल्याण सभापती जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या सहकार्याने व अथक परिश्रमाने आणि शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांच्या विनंतीला मान देऊन पुनर्वसन स्थळ सिनाळा ते जुना सिनाळा शालेय विद्यार्थ्यांना w.c.l. कडून ये-जा करण्याकरिता बस उपलब्ध करून दिले आहे. त्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक जिल्हा परिषद शाळा सिनाळाच्या वतीने आभार मानले. तसेच स्कूल बसला हिरवी झेंडा दाखवून विद्यार्थ्यांना सुरक्षित रवाना करण्यात आले. या वेळी माननीय मुख्याध्यापिका श्रीमती नीती रामटेके, श्याम म्हशाखेत्री अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती सिनाळा, सौ.गीता ताई वैद्य, राजू वैद्य, किशोर मांडवकर यांची उपस्थिती होती…

शिक्षकांची जीवनवाहिनी म्हणजे विद्यार्थी. माझा विद्यार्थी हा शब्द बोलतांना आयुष्य कधी सरते ते कळत देखील नाही. शेवटच्या श्वासापर्यंत हा माझा विद्यार्थी असेच शब्द बाहेर पडतात आणि आयुष्य सार्थकी लागते. विद्यार्थ्यांची अडचण ओळखून विद्यार्थ्यांसाठी बस सुरू केल्याबद्दल शिक्षिका तथा सभापती पदावर उतुंग भरारी गाठणाऱ्या रोशनी ताई खान यांचे मी अध्यक्ष या नात्याने मनापासून खूप खूप आभार मानतो..

-श्याम म्हशाखेत्री
अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, सीनाळा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here