जोगीसाखरा येथे भव्य व्हालीबाॅल स्पर्धेचा उदघाटन सोहळा पार पडला..

0
53

गौरव लूटे आरमोरी प्रतिनिधी

जोगीसाखरा -जय शिवाजी स्पोर्ट्स क्लब जोगीसाखरा यांच्या वतीने १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत आयोजित करण्यात आलेल्या भव्य व्हालीबाॅल स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.याप्रसंगी कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून मा.मोहीनी भूषणसिंग खंडाते, सह उद्घाटक माजी आमदार हरिरामजी वरखडे ,अध्यक्ष म्हणून सरपंच संदीप ठाकूर, उपाध्यक्ष जिल्हा परिषद सदस्या मनिषा दोनाडकर, ला.अ.प.व.वडसा भुषणसिंग खंडाते उपस्थित होते. “पब्जी सारख्या खेळात आजची युवा पिढी मोठ्या प्रमाणात जात आहे.

सुदृढ निरोगी शरीर तसेच शारिरीक मानसिक विकासासाठी मैदानी खेळाची आवश्यकता आहे.ग्रीन जिम साठी प्रस्ताव केले आहे…असे प्रमुख मार्गदर्शन सरपंच संदीप ठाकूर यांनी केले. या कार्यक्रमाला मान्यवर जवाहरलाल नेहरू विद्यालयाचे मुख्यध्यापक खरकाटे सर, विजय सहारे, ग्रा.पं.सदस्या प्रतिभा मोहूर्ले, ग्रा.पं.सदस्या ज्योती घुटके, ग्रा.पं.सदस्य स्वप्निल गरफडे ,ग्रा.पं.सदस्य देवदास ठाकरे , पोस्टमास्तर जी.डब्लू.टेंभुर्णे मॅडम, ग्रा.पं. सदस्या करिश्मा मानकर , ग्रा.पं.सदस्या अश्विनी घोडाम आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक व युवावर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.‌या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रलोभ कोल्हे सर‌ व आभार प्रदर्शन समिर मोहूर्ले यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here