शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) या संस्थेत प्रवेशासाठी अर्ज आमंत्रित

0
49

चंद्रपूर : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) चंद्रपूर या संस्थेत ड्रेस मेकिंग, फ्रुट अँड वेजिटेबल प्रोसेसिंग, बेकर अंड कन्फेक्शनर, सेक्रेटरियल प्रॅक्टिस (इंग्लिश) बेसिक कॉस्मेटोलॉजी व स्युईंग टेक्नॉलॉजी या सहा व्यावसायिक कोर्सच्या जागा रिक्त आहेत.

प्रशिक्षण महासंचालनालय, नवी दिल्ली यांनी सदर कोर्सच्या प्रवेशाची अंतिम तारीख दि. 18 नोव्हेंबर 2021 पर्यंत वाढविली असल्याने, तसेच विहित मुदतीत प्रवेश अर्ज सादर करू न शकलेल्या उमेदवारांना समुपदेशन फेरीत संधी उपलब्ध करून देण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने नव्याने प्रवेश अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती करणे तसेच प्रवेश अर्ज शुल्क भरणे याकरिता दि. 1 ते 7 नोव्हेंबर 2021 रोजी 11 ते 5 वाजेपर्यंतच्या कालावधीत https://admission.det.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन अर्ज सादर करावे व उपलब्ध संधीचा लाभ घ्यावा.

तसेच शासकीय प्रवेश पद्धती, नियमावली, प्रदेश संकेतस्थळाबाबत काही तांत्रिक अडचण व अनुषंगिक शंका असल्यास शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची), चंद्रपूर येथे संपर्क साधावा. असे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या पी.एच दहाटे यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here