देश की शान संविधान’ या विषयावर विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय कविता स्पर्धा…

0
95

चंद्रपूर प्रतिनिधी-पुरोगामी पत्रकार संघ तथा पुरोगामी साहित्य संसद च्या वतीने संविधान दिनाचे औचित्य साधून 24 नोव्हेंबर रोजी ‘देश की शान भारतीय संविधान’ या विषयावर जिल्हा स्तरीय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कविता स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. प्रथम पारितोषिक 3 हजार(निलेश ठाकरे विदर्भ संघटक पुरोगामी पत्रकार संघ)यांचे तर्फे),द्वितीय पारितोषिक 2 हजार रुपये(मनोज मोडक भद्रावती तालुका कार्याध्यक्ष,पुरोगामी पत्रकार संघ)तृतीय पारितोषिक 1 हजार रुपये (मुन्ना तावाडे,चंद्रपूर तालुका अध्यक्ष,पुरोगामी पत्रकार संघ)प्रोत्साहन पुरस्कार तथा प्रथम,द्वितीय,तृतीय स्पर्धकांना सन्मानचिन्ह व सहभागी सर्व स्पर्धकांना सन्मान पत्र देण्यात येणार आहे.
या संबंधाने लवकरच कार्यक्रम स्थळ,वेळ, नियम व अटी ठरविण्यात येणार असून,अधिक माहिती साठी स्पर्धकांनी कृपया पुरोगामी साहित्य संसदेच्या चंद्रपूर जिल्हा अध्यक्षा एड.योगिता रायपुरे मो.न.8180875083 यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन पुरोगामी साहित्य संसदेच्या जिल्हा संपर्क प्रमुख सीमा भासारकर,जिल्हा संघटिका मृणाल कांबळे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here