शिक्षक दिनी जिवती तालुक्यातील दोन शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कार प्रदान

0
149

जिवती/दिपक साबने

जिवती: पंचायत समिती जिवती अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, पालडोह जिल्ह्यातील ३६५ दिवस चालणाऱ्या शाळेतील शिक्षक राजेंद्र उदेभान परतेकी व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा येल्लापूर येथील शिक्षक गजानन रामदास मेश्राम यांना सन २०२१-२०२२ च्या जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ तथा पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

शिक्षक हा ग्रामीण भागातील आत्मा असतो, शिक्षक हा अतिसंवेदनशील असतो, शिक्षक हा समाजाप्रती जागरूक असतो, शिक्षक समर्पित भावनेने कार्य करतो, शिक्षक हा करूनादायी, समाजशील असतो म्हणून शिक्षकाची व्याप्ती ही फार मोठी आहे. शिक्षकांमध्ये समाज घडवण्याची क्षमता असते. शिक्षक दिनानिमित्त उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्ह्यातील एकूण १६ शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने कन्नमवार सभागृह जिल्हा परिषद चंद्रपूर येथे आयोजित समारंभामध्ये सन्मानीत करण्यात आले.

जिल्यातील ३६५ दिवस चालणारी शाळा, या वर्षी राज्य शैक्षणिक विचार गटात निवड , तथा या वर्षी NEIPA अंतर्गत महाराष्ट्रातील जिल्हा परिषद उकृष्ठ शाळेत या शाळेने चंद्रपूर जिल्हा परिषद शाळेचा बहुमान मिळवत पालडोह ने १७ वा क्रमांक मिळवला आहे.

राजेंद्र उदेभान परतेकी व गजानन रामदास मेश्राम यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार विजय वडेट्टीवार, पालकमंत्री चंदपूर तथा मदत व पुनर्वसन मंत्री, महाराष्ट्र राज्य सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ तथा पुष्पगुच्छ देऊन गौरविले. जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरुनुले, आमदार किशोर जोरगेवार,चंद्रपूर, राजू गायकवाड, वित्त व बांधकाम सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. मिताली सेठी, उल्हास नरड, शिक्षणाधिकारी माध्यमिक, दिपेंद्र लोखंडे, शिक्षणाधिकारी प्राथमीक व आदरणीय व्यासपीठावर मान्यवर यांनी सहपत्नीक हा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले.

जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत एकूण १६ पुरस्कार वितरित करण्यात आले त्यापैकी एक माध्यमिक व कला विशेष पुरस्कार असे एकूण १६ पुरस्कार जिल्हा परिषद यांनी जाहीर करून वितरण केले. सोबतच या सर्व शिक्षकांना पुरस्कार वितरित केल्या नंतर एक शिक्षक प्रतिनिधी म्हणून व्यासपीठावर दोन शब्द बोलण्याकरिता परतेकी सर याना व्यासपीठावर बोलण्याकरिता पाचारण केले. तेव्हा त्यांनी जिवती हा भाग जरी मागासलेला असेल पण शिक्षणात कुठेही मागे नाही असे सांगितले व पालडोह येथे इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंत चे वर्ग असून तिथल्या मुलांना शिक्षण मिळण्यासाठी ९ वा व १० वा वर्ग जोडण्यासाठी मदत करावी करिता जिल्ह्याचे पालकमंत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषद अध्यक्ष याना आपल्या शब्दातून विनंती केली.

त्याच दिवशी आयडियल टीचर अवॉर्ड ने राजेंद्र परतेकी सरांना JCI रॉयल राजुरा यांनी सुद्धा सन्मानीत केले.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून प्रत्येकी १ उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले परंतु जिवती तालुक्यातील २ शिक्षकांना सदर पुरस्काराने गौरविण्यात आल्यामुळे तालुक्यातील राजकीय , सामाजिक व विविध विभागातून राजेंद्र परतेकी सर व गजानन रामदास मेश्राम सर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here