HomeBreaking Newsबंगाली कँप फुकटनगर चौकातील धम्मध्वजाचा अवमान करुन सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यावर कारवाई...

बंगाली कँप फुकटनगर चौकातील धम्मध्वजाचा अवमान करुन सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यावर कारवाई करा■ शांतीदुत परिवर्तन बौद्ध मंडळाच्या वतीने ऑल इंडिया पँथर सेनेचे ठाणेदारांना निवेदन

Advertisements

चंद्रपूर : शांतीदुत परिवर्तन बौद्ध मंडळ च्या माध्यमातून परिवर्तन चौक, राजीव गांधी नगर, चंद्रपूर येथे मागील १५ वर्षा पासून सदर खुल्या जागा जंगल स्वरुपात असतांना समाजाने साफसफाई करून त्या ठिकाणी धम्मध्वज उभारण्यात आला व त्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तसेच इतर समाज प्रबोधन कार्यक्रम घेऊन समाज जागृतीचे काम मागील १५ वर्षापासून येथील बौद्व बांधव करीत आहेत.

Advertisements

दरवर्षी बौद्ध समाज बांधवाकडून त्या ठिकाणी थोड्या-थोड्या प्रमाणात त्या जागेचा विकास करणे सुरु आहे. दिनांक २३.०८.२०२१ रोजी सोमवार ला प्रभुजी मेश्राम यांचे निवासस्थानी मंडळाची सभा घेण्यात आली व चबुतरा निर्माण करण्याचे ठरविण्यात आले, निळा झेंडा च्या नियोजित जागेच्या बाजूचे घर असलेले विकृत मानसिकता असलेले समाजकंटक झेंड्याला विरोध करुन बौद्ध समजाबद्धल अपशब्ध बोलून झेंडा चबूतरा बांधकामासाठी आणलेल्या विटा फेक-फाक केले.

या ठिकाणी काही करायचे नाही अशा प्रकारे बोलून दाखविले. दिनांक २९.०८.२०२१ रविवार ला सकाळी १०.०० ते १२.०० वाजताच्या दरम्यान शांतीदुत परिवर्तन बौद्ध मंडळाच्या धम्म ध्वजाची अवमानणा करण्याचे कृत्य करीत दिनेश पोरशेट्टीवार व त्यांचे वडील नितेश भक्त व इतर समाजकंटकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चबुतल्यावर चप्पल, जोडे ठेऊन बौद्ध समाजाती बांधवाना मारण्याची धमकी दिली. त्यामुळे बौद्ध समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. व जातीय तेढ निर्माण केली जात आहे.

गुंड प्रवृत्तीने वागून बौद्ध समाजातील लोकांना मारण्याची धमकी देत आहेत. त्यामुळे भविष्यात कोणत्याही प्रकारची जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्या लोकांवर कायदेशीररित्या कार्यवाही करण्यात यावी याचे निवेदन रामनगर पोलीस स्टेशन ठाणेदार यांना देण्यात आले.
निवेदन देतांना ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हा सल्लागार संतोष डांगे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार,ऑल इंडिया पँथर सेनेचे कार्यकर्ते भैय्याजी मानकर,शांतीदुत परिवर्तन बौद्ध मंडळाचे अध्यक्ष प्रभु मेश्राम, उपाध्यक्ष रांजेद्र गेडाम, नामदेव बोधुले, नंदकुमार कांबळे आदींची उपस्थिती होती.

Advertisements
Advertisements
India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!