Home Breaking News वणी(खुर्द)येथील पिडितांच्या न्यायासाठी ऑल इंडिया पँथर उतरली रस्त्यावर...पोलिसांची व कार्यरत दिग्गज प्रतिनिधींची...

वणी(खुर्द)येथील पिडितांच्या न्यायासाठी ऑल इंडिया पँथर उतरली रस्त्यावर…पोलिसांची व कार्यरत दिग्गज प्रतिनिधींची भूमिका संशयास्पद…

चंद्रपूर-जिल्ह्यात जिवती तालुक्यातील वणी खुर्द येथील घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे. ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्राध्यक्ष दिपकभाई केदार व चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार यांचा ताफा गावात जाऊन तळागाळातील गोष्टी पीडितांकडून जाणून घेतल्या.एक एक शब्द आणि प्रसंग ऐकताच हृदय कळवळून येत होत.प्रति खैरलांजी घडवण्याचाच कट होता. संपूर्ण गाव या कटात सहभागी होत.

शांताबाई कांबळे ही एक बौद्ध धर्माच्या वाटेवर चालणारी महिला आहे. ह्या महिलेने आजपर्यंत खूप मोठं सामाजिक दायित्व जोपासलं आहे. ते असे कि ही महिला गावातील ९० टक्के लोकांच्या घरच्या बाळंतपण स्वतःच्या हाताने केले आहे.एवढंच नाही तर त्या बाळंतीण बायांसोबत दवाखान्यात १५-१५ दिवस दवाखान्यात वास्तव्य केले आहे. दवाखान्यातुन घरी आल्यावर त्यांच्या घरी जाऊन घरकाम व बाळांची देखभाल केली आहे. मात्र तेव्हा त्या गावकऱ्यांना कुठलीही करणी होत नव्हती.

मात्र कटकारस्थान रचणाऱ्या गुंडांकडून खूप मोठं षड्यंत्र रचलं जात आणि गावातील 3-4 महिलांच्या अंगात येत.आणि त्या अंगात आलेल्या महिला याच बौद्ध कुटूंबाला धारेवर धरून यांचे नाव घेते.त्या कटकारस्थान्याच्या सहकारी महिलांवर विश्वास ठेवत या कुटुंबियांना घरून बोलावून चौकात नेलं जातं आणि त्यांना बांधून बेदम मारण्यास गावगुंडांकडून सुरुवात केली जाते.

शांताबाई कांबळे ही बौद्ध महिला करणी करते म्हणत तिच्या कुटुंबातील सात जणांना बांधून मारहाण केली जाते. मारतांना कुणी मारतांना मलमूत्र विसर्जन सुध्दा होत.बेभान होऊन त्यांना मारहाण सुरूच असते. एवढचं नाही तर त्यांतील महिलेने पिण्यासाठी पाणी मागितले असता तिला पाणी दिल नाही पण तर एका लहान मुलाने तिला स्वतः लघवी करून तिला पाजलं.हे अंगावर शहारे उठवणारी घटना आहे.

सैतानांनी जनावरांवर घाव केल्यासारखं लाठ्याकाठ्यानी हल्ला केला. फाशी लागेपर्यंत शांताबाईला फास लावल्या गेला. वृद्ध एकनाथ हुकेंचा हात मोडला एवढा अतोनात छळ करण्यात आला. गाव बघ्याची भूमिका घेतली होती. सडलेल्या मानसिकतेचे सांड पोरं तुटून पडले होते. व्हिडिओ बघितले असता अंगावर काटा आणणारे आहेत. सविस्तर असे झाले की, दोन महिन्या आधी रोज बुद्ध वंदनेचा आवाज भोंग्यातून येतो म्हणून लोकांनी विरोध सुरू केला, वाद वाढत गेला, बौद्ध बांधव बुद्ध वंदना घ्यायचे, महापुरुषांच्या जयंत्या करायचे, भोंग्याच्या आवाजावरून भांडण सुरु झालं.

• शांताबाई कांबळे या बौद्ध महिलेवर भानामतीचा आरोप घालायचा आणि त्यांना संपवायचे हा सुनियोजित कट रचलेला होता. त्यासाठी थेरी रचण्यात आली. गावात कुणीही मेल की शांताबाई कांबळे मुळेच मेलं म्हणायचं आणि मेलेल्यांच्या कुटुंबातील तरुणांना भडकवायचे. अशाप्रकारे शांताबाई विरोधात आवाज उठवला गेला.

• त्यादिवशी गावात सवारी काढण्यात आली, सवारी येऊन गेल्यावर, दुसऱ्या दिवशी गावाच्या मंदीरासमोर लोकांना गोळा करण्यात आले, तीन डम्मी महिला आधीच तयार होत्या, शांतबाईच्या कुटुंबाला सुद्धा बोलवण्यात आले होते, त्या तीन महिला अचानक लोळायला लागल्या, आणि अंगात आलं म्हणे तेवढ्यात त्या माती फेकायला लागल्या, माती फेकण्याचा अर्थ असा होता की ज्याच्याकडे माती जाईल त्याने भानामती केली म्हणून हिच्या अंगात आले, त्या तीन महिलांनी ठरल्याप्रमाणे या 7 जणांवर माती फेकली आणि त्यानंतर मानवता नागवायला सुरवात झाली.

अचानक सैतानानी हल्लाबोल केला या सात जणांना जबरदस्त मारहाण सुरू केली, जबर मारल्या नंतर गळ्यात बगलेत फास घालून बांधून टाकायचे. एकनाथ हुके 75 वर्षांचे त्यांचा हात मोडला, 38 वर्षीय महिलेला जमिनीवर पाडून मारहाण करण्यात आली. गंभीर जखमी करण्यात आले. लोक हा हल्ला मुकाट्याने बघत होते. कुणाच्यातही मानवता जागी झाली नाही. कुणीही पुढे आला नाही. हळहळ करून त्यांनी जीवे मरण्याच्या उद्देशाने हल्ले केले.

• अनिल सोनकांबळे मुळे वाचली खैरलांजीची पुनरावृत्ती अनिल सोनकांबळे दुसऱ्या गावात होता त्याने पोलीस आणले, अनिल सोनकांबळे म्हणत आहे की, गावाच्या बाहेर तीन पोलीस आणि एक गाडी उभा होती पण प्रश्न हा आहे की ते गावात का गेले नाहीत. माणसं मेल्यावर ते येणार होते का? सोनकांबळे नि गाडी बोलावली म्हणून गावच्या सरपंचाने खांद्यावर हात टाकून बाजूला घेतलं आणि झुंड त्याच्यावरही तुटून पडली, बेदम मारहाण अनिलला सुद्धा केली. मुंडे नामक पोलीस कर्मचाऱ्याने त्याला वाचवलं. जखमींना गाडीत टाकल्यावर पोलीसांच्या गाडीच्या बॉनेटवर हे गावगुंड सैतान बसले आणि ही गाडीच जाळून टाका असे म्हणू लागले.

• पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. पोलीस तात्काळ का पोहोचली नाही? मारहाण डांबने सुरु असतांना गावाबाहेर पोलीस गाडीसहित का उभे होते? जबाब बदलू नका म्हणून डीवायएसपी खाजगीत दबाव का आणत आहे? ठाणेदार संतोष अंबिके या पीडित महिलांनाच टार्गेट का करत आहे? आतापर्यंत सर्व आरोपी अटक का केले नाहीत? मास्टरमाईंड गावात फिरत असतांना त्यांना अटक होत नाही आणि जे हल्ल्यात नाहीत त्या दोघांना तात्काळ अटक का केली? घटना घडल्यानंतर एफआयआर फाडायला 2 दिवस का लावले? 2 दिवस प्रकरण का दडपून ठेवलं? गावात सामाजिक कार्येकर्त्याना जाण्यापासून का रोखण्यात आले?

• काँग्रेस आमदार धोटे प्रकरणाला वेगळं वळण देऊन प्रकरण संपवण्यासाठी प्रयत्न करत आहे. आमदार धोटे गावात मारहाण करणार्यांना भेटले पण पीडिताना भेटले नाही? शांताबाई कांबळे करणी करते, तिला या आधीही एका गावातून हाकलले आहे असे म्हणत एक प्रकारे आरोपींचे हस्तक झाले आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका संशयास्पद आहे. मतासाठी मानवतेला मातीत गाडणारी आहे.

• शांताबाई कांबळे कोण आहे 65 वर्षीय बौद्ध महिला आहे. तिने सामाजिक कार्य केलेले आहे. वणीखुर्द गावात तिने अनेक बाळंतपण केले, त्यांच्यासाठी धावून गेली. करणी चा आरोप शांताबाईवर होतो तेंव्हा जेंव्हा बाळंतपणासाठी जेंव्हा तिची गरज लागते तेंव्हा करणी होत नाही का? आज
• आजपर्यंत पालकमंत्री, खासदार भेटले नाहीत हे निंदनीय आहे.
• सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी, पीडितांना कायमस्वरूपी संरक्षण द्यावे, पीडित कुटुंबाचे सामाजिक आयुष्य उद्धवस्त झाले आहे त्यांना 1 करोडची मदत देऊन त्यांचे पुनर्वसन करावे, आरोपी गावगुंडांवर मोक्का अंतर्गत कार्यवाही करावी, सामाजिक न्याय विभाग व राज्यसरकारने अंधश्रद्धेचे व सामाजिक निरक्षरतचे रेड बेल्ट आखावे आणि त्या भागाचे सामाजिक स्तर व अंधश्रद्धामुक्त चंद्रपूर करण्यासाठी कार्यकर्त्यांना समताधुताना भरपूर मानधन देऊन मोहीम राबवावी, आरोपींना पाठीशी घालणार्या व घटना दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या ठाणेदार व डीवायएसपी यांचे तात्काळ निलंबन करावे.अनिल सोनकांबळे मूळे त्यांचे प्राण वाचले म्हणून त्याला शासकीय सेवेत घ्यावे.शांताबाई कांबळे ह्या महिलेंने निस्वार्थपणे गावातील बाळंतपण केले आहे त्यामुळे या दायीन बाईला पुरस्कृत करावे.अश्या विविध मागण्या घेऊन ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्राध्यक्ष दिपकभाई केदार,चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार यांच्या नेतृत्वात दिनांक २७ आगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश आंदोलन करण्यात आले.सोबतीला या घटनेची दखल घेण्यासाठी आक्रोश खोब्रागडे,अतुल भडके,भैय्यालाल मानकर,पपिता जुनघरे आदींनी सक्रियता दाखवली

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
मुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556
RELATED ARTICLES

मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला तयार; उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना स्पष्टच सांगितले.

राज्यात शिवसेनेचे मातब्बर नेते तथा मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदेंसोबत सर्व बंडखोर आमदार सध्या गुवाहटीमध्ये...

सांगली हादरल! एकाच कुटुंबातील 9 जणांची आत्महत्या, विष घेत आयुष्य संपवलं

सांगली – म्हैसाळकारांचा सोमवारचा दिवस उजाडला तोच एका हादरवणाऱ्या बातमीनं.. गावात परिचित असलेल्या दोन भावांच्या संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केल्याची माहिती काही क्षणांत गावातल्या घराघरात...

मोठी बातमी: जेष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांना कॅन्सरचे निदान.. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु

चक्रधर मेश्राम पुणे: जेष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना ब्लड कँसरचे निदान झाले असून उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आमटे यांना दुर्मिळ अशा...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

चंद्रपुर श्रमिक पत्रकार भवन में डिजिटल कार्यशाला |

प्रलय म्हशाखेत्री (चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधी) चंद्रपुर: डिजिटल मीडिया का प्रसार प्रिंट और इलेक्ट्रॉनिक मीडिया के लिए एक बड़ी चुनौती है। डिजिटल मीडिया वास्तव में क्या...

खेलो इंडिया : क्रीडा सुविधांची माहिती ३० जूनपर्यंत मागविली

रंजित उंदरे (वाशीम जिल्हा प्रतिनिधी) वाशिम: केंद्र शासनाने " खेलो इंडिया " पोर्टल कार्यान्वीत केले आहे.जिल्ह्यातील विविध शासकीय/खाजगी शाळा, महाविद्यालय,संस्था,तसेच संघटना यांच्याकडे उपलब्ध असलेल्या क्रीडा...

शेतकऱ्यांनो ! पेरणीची घाई करु नका… 80 ते 100 मीमी. पाऊस पडल्यावरच पेरणी करा… कृषी विभागाचे आवाहन

रंजित उंदरे (वाशीम जिल्हा प्रतिनिधी) वाशिम: यंदाच्या खरीप हंगामात 13 जूनपासून पावसाला सुरुवात झाली आहे. 16 जूनपर्यंत वाशिम तालुक्यातील राजगाव महसुल मंडळात 78.9 मिमी, वारला...

पीसीपीएनडीटी कार्यक्रम: खबरी व्यक्तीला मिळाले १ लाख रुपये बक्षीस रक्कम

रंजित उंदरे (वाशीम जिल्हा प्रतिनिधी) वाशिम: गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र लिंग निवडीस प्रतिबंध कायदा (पीसीपीएनडीटी) या कार्यक्रमांतर्गत १८ ऑगस्ट २०२१ रोजी वाशीम येथील डॉ.सारसकर...

Recent Comments

Don`t copy text!