ब्रेकिंग: विज पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू…गोंडपिपरी तालुक्यातील वेडगाव शेतशिवारातील घटना…

0
1565

शरद कुकूडकार प्रतिनिधी*

गोंडपिपरी तालुक्यातील वेडगाव येथील दोन शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना आज दि.16 आगस्ट रोज सोमवारला दुपारी 2 वाजताच्या सुमारास वेडगाव शेत शिवारात घडली.

वेडगाव येथील मारोती बाबूंराव चौधरी, वय 36 वर्ष आणि रेखा अरुण घुबडे वय 28 वर्ष हे नामदेव कलपलीवर यांच्या शेतामध्ये काम करीत असताना पाऊस सुरू झाला असता दोघेही हातचे काम टाकून शेतातील एका बोरीच्या झाडा खाली उभे असताना अचानक वीज कडाडली अन त्यांच्या अंगावर पडली असता त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दवी घटना गोंडपीपरी तालुक्यातील वेडगाव शेतशीवारात घडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here