सामाजिक कार्यकर्ते अनुप कोहळे जिल्हा युवक पुरस्काराने सन्मानित…

0
36

क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत, जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय गडचिरोली च्या वतीने देण्यात येणारा २०२० – २१ चा जिल्हा युवक पुरस्कार अनुप वसंत कोहळे यांना देण्यात आला.

सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव म्हणून मा.ना.राजेंद्र पा.यड्रावकर, मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे शासकीय कार्यक्रमात अनुप वसंत कोहळे यांना सन्मान चिन्ह, गौरव पत्र व १० हजार रुपये रोख देऊन गौरविण्यात आले. यावेळी आमदार डॉ.देवराव होळी, जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडलावार, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक अंकित गोयल आधी मान्यवर उपस्थित होते.

सामान्य कुटुंबात जन्माला आलेला अनुप कोहळे हे चामोर्शी तालुक्यातील राजनगट्टा या लहानशा खेडेगावातील शेतकरी कुटुंबातील युवक आहे. त्याने बी ए पदवी शिक्षण पूर्ण करून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली असून , लॉकडाऊन च्या काळात सामाजिक कार्यात सक्रिय झाला.

खरं तर महाविद्यालयीन जीवनात रा.से.यो. व इतर माध्यमातून सामाजिक कार्याची गोडी त्याच्या मनात रुजली. आणि काही ठिकणी काम करण्याची संधी देखील मिळाली. स्पर्धापरीक्षेचा अभ्यास करतांना पुढे चालून समाजासाठीच कार्य करायचे ही जण त्याच्या मनात आली. आणि स्वतः खेडे गावातील विद्यार्थी असल्याने खेड्यातील युवकांना सामाजिक व शैक्षणिक लाभ व्हावा म्हणून लॉकडाऊन च्या मागील दोन वर्षा च्या काळात शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्यात कौशल्य विकसित करण्याच्या दृष्टीने अभ्यास सुरू उपक्रमातून मार्गदर्शन केले.

त्यांच्या साठी वीविध सांस्कृतिक कार्यक्रम, वक्तृत्व, काव्यवाचन सारख्या स्पर्धांचे आयोजन केले , लॉकडाऊन काळात गरजूंना लोकवर्गणी च्या माध्यमातून अन्य धान्याची मदत, स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या युवकांसाठी मोफत मार्गर्दशन व सैन्य भरती प्रशिक्षण शिबीर , विविध क्रीडा सत्रांचे आयोजन, पर्यावरण जनजागृती म्हणुन नियमित वृक्षारोपण, ग्रामस्वच्छता, पशु-पक्षा साठी पाणपोई, वन्यजीव सप्ताह यासारखे उपक्रम. याव्यतिरिक्त लोकांमध्ये जागतिक एड्स दिन, मतदाता दिन व अन्य विषयावर जनजागृती अभियान राबविले शेतकऱ्यांसाठी तज्ज्ञांच्या मदतीने कृषी शाळेचे आयोजन. लिखानाच्या माध्यमातून कोरोना संदर्भात जनजागृती. वक्ता म्हणुन विविध ठिकाणी समाज प्रबोधन. वाढदिवसाच्या निमित्ताने कधी रक्तदान शिबिर , रुग्णालयात फळ वाटप सारखे अनके उपक्रम अनुप कोहळे यांनी आज पर्यंत राबविले आहे. समाज हितासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना जिल्हा युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे

त्यांनी आपल्या पुरस्काराचे श्रेय आई मंजुषा व वडील वसंत कोहळे मार्गदर्शक प्रा. दिलीप चौधरी ,मित्र समीर राहुड आणि इतर सहकारी मित्रांना दिले असून त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here