बल्लारपूर शहरात सध्या चाललंय तरी काय? तलवारीने दहशत पसरविण्याचा प्रयत्न…

0
464

बल्लारपूर :- एकेकाळी शांततेच प्रतिक असणार बल्लारपूर शहर आज गुन्हेगारी युक्त शहर तर बनत चाललंय आहे लहान-सहान वादातून तलवार निघणे ही नित्याचीच बाब झाली की काय असाही प्रश्न निर्माण होत आहे बल्लारपूर शहरातील जुन्या बसस्थानक परिसरात झालेल्या हत्येपासून सुरू झालेले सत्र पुढे सुरूच आहे की काय? नुकतीच काही दिवसांपूर्वी बल्लारपूर शहरातील महाराणा प्रताप वार्ड परिसरात बोग्गा नावाच्या इसमावर 3 ते 4 व्यक्तींनी तलवारीनेच हल्ला करून गंभीर जखमी केले होते व त्यांचेवर 15 दिवस नागपुरात उपचार सुरू होते मात्र 2 ते 3 दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला ही घटना ताजी असतांनाच काल बुधवारला रात्री 9:00 वाजताच्या सुमारास महाराणा प्रताप वार्डातीलच एक अज्ञात व्यक्ती आपल्या दोन्ही हातात तलवार घेऊन परिसरात दहशत पसरवीत होता विश्वसनीय सूत्राच्या माहितीनुसार काही महिलांवर हल्ला करण्याची धमकी देत होता मात्र वेळीच प्रसंगावधान राखून या घटनेची माहिती बल्लारपूर पोलिसांना देण्यात आली पोलीस वेळीच घटनास्थळी दाखल होऊन त्या अज्ञात व्यक्तीला तलवारीसह अटक केली व काही अनिष्ट होण्यापासून परावृत्त केले या संबंधीचा पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत असून या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे दिवसेंदिवस शहरात गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ होत आहे, भाईगिरीचे प्रस्थ वाढत चालले आहे येत्या काही दिवसात बल्लारपूर शहरात भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर शहरात अशा घटनांमुळे समाजात चिंतेचे वातावरण पसरत चालले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here