महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी काल लोकसभेत १२७ व्या घटना दुरुस्तीबाबत चर्चेत काँग्रेस पक्षातर्फे सहभाग घेतला होता. या घटना दुरुस्तीला समर्थन दिले. परंतु तो व्हिडीओ अर्धवट “देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र” या फेसबुक पेजवरून मराठा समाजाला आरक्षण देऊ नका काँग्रेसची संसदेत मागणी या ठळक मथळ्याखाली पोस्ट करण्यात आली. या खोट्या पोस्ट विरोधात आज वरोरा शहर काँग्रेस कमेटी अध्यक्ष विलास टिपले यांनी पोलिसात धाव घेत या पेजविरोधात तक्रार दाखल केली आहे.
महत्वाची बाब म्हणजे मराठा समाजाला आरक्षण देऊ नका असे काँग्रेसचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी सदर व्हिडीओ मध्ये कुठेच म्हंटले नाही. काँग्रेस पक्ष व खासदार धानोरकर मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत नेहमी आग्रही आहेत. मराठा आरक्षणाला पूरक अशा घटना दुरुस्तीचे खासदार धानोरकर यांनी समर्थन केले असतांना त्याबाबत सपशेल खोटी माहिती पसरवून त्यांची बदनामी करण्याच्या प्रयत्न या फेसबुक पोस्टवरून होत आहे.
हि पोस्ट फेसबुक वरून काढण्यासाठी आज अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना तक्रार देऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावेळी वरोरा शहर काँग्रेस अध्यक्ष विलास टिपले, नगरसेवक राजू महाजन, वरोरा शहर काँग्रेस सचिव मनोहर स्वामी यांची उपस्थिती होती.
Advertisements
“देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र ” या फेसबुक पेजवरील खोट्या व चुकीच्या पोस्ट विरोधात पोलिसात तक्रार
Advertisements
RELATED ARTICLES
Recent Comments
Advertisements
Advertisements