HomeBreaking Newsचंद्रपूर शहरात १ लाखावर व्यक्तींनी घेतली कोरोनाची लस ४५ हजार ४६८...

चंद्रपूर शहरात १ लाखावर व्यक्तींनी घेतली कोरोनाची लस ४५ हजार ४६८ व्यक्तींची दुसरी मात्रा पूर्ण

चंद्रपूर, ता. १० : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत शहरात विविध ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करून कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. १० ऑगस्टअखेरपर्यंत १ लाख २ हजार १३१ व्यक्तींनी कोरोना लसीची पहिली मात्रा घेतली. यातील ४५ हजार ४६८ व्यक्तींची दुसरी मात्रादेखील पूर्ण झाली हे विशेष.

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची सुरुवात दिनांक १६ जानेवारी २०२१ पासून करण्यात आली. प्रारंभी आरोग्य सेवेतील व्यक्तींना मात्रा देण्यात आली. त्यात आतापर्यंत ७ हजार ८६० आरोग्य सेवकांना पहिली मात्रा, तर ६ हजार ४६० जणांना दुसरी मात्रा देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या पोलिस, महसूल व इतर अत्यावश्यक सेवेतील ७ हजार ९३९ व्यक्तींना पहिली मात्रा, तर ५ हजार ५९१ जणांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे.

तिसऱ्या टप्प्यात १ एप्रिलपासून ४५ वर्षावरील व्याधीग्रस्त नागरिक व ६० वर्षावरील सर्व नागरिकांना लस देण्याचे धोरण शासनातर्फे अवलंबण्यात आले. आतापर्यंत ४५ वर्षावरील ३२ हजार ४१८ ज्येष्ठ नागरिकांना पहिली, तर १५ हजार ९६० व्यक्तींना दुसरी मात्रा देण्यात आली. तसेच ६० वर्षावरील १९ हजार ६१५ नागरिकांना पहिली मात्रा देण्यात आली. यातील १२ हजार ३५६ जणांची दुसरी मात्रा पूर्ण झाली आहे.

शासन निर्देशानुसार चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत २ मेपासून १८ ते ४४ वयोगातील व्यक्तींना लसीकरण सुरु करण्यात आले. त्यासाठी ठिकठिकाणी वाढीव आणि राखीव केंद्र निर्धारित करण्यात आले होते. यात ३४ हजार २९९ जणांना पहिली मात्रा देण्यात आली. यातील ५ हजार २०१ जणांची दुसरी मात्रा देखील पूर्ण झाली आहे. शासन निर्देशानुसार सर्व पात्र वयोगटातील व्यक्तींना १० ऑगस्टअखेरपर्यंत एकूण १ लाख ४७ हजार ५९९ जणांना पहिली व दुसरी मात्रा पूर्ण झाली आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!